घरताज्या घडामोडीAryan Khan Bail: आर्यनच्या सपोर्टसाठी चाहत्यांची गर्दी,मन्नतबाहेर पोलिसांचा फौज फाटा

Aryan Khan Bail: आर्यनच्या सपोर्टसाठी चाहत्यांची गर्दी,मन्नतबाहेर पोलिसांचा फौज फाटा

Subscribe

अभिनेता शाहरुख खानचा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आर्यनच्या जामीनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांनी गुरुवारी संध्याकाळी एकच गर्दी केली होती. २६ दिवसांनंतर आर्यन खानची सुटका झाल्यानंतर अनेकांनी मन्नत बाहेर गुरुवारी फटाक्यांची आतिषबाजी केली. शाहरुखचे चाहते वी सपोर्ट आर्यन खान सारखे पोस्टर घेऊन मन्नत बाहेर उभे होते. त्याचप्रमाणे मन्नतबाहेर अनेक मीडिया कर्मी देखील जमा झाले होते. मन्नत बाहेर जमा झालेली गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनची एक टीम मन्नत बाहेर तैनात करण्यात आली आहे.  शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चाहते मन्नत बाहेर जमा झाले होते. शुक्रवारी आर्यनच्या जामीनाची प्रत जारी करुन आर्यनची सुटका करण्यात येणार आहे त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा मन्नत बाहेर चाहत्यांची गर्दी होण्यात सुरुवात झाली आहेत.

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -