एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही मिटेना! पुढील सुनावणी २० डिसेंबरला

ST workers at Azad Maidan protesting against State Govt hc hearing on 20 december
एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही मिटेना! पुढील सुनावणी २० डिसेंबरला

गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मुंबईच्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. ऊन, पाऊस कशाचीही पर्वा न करत एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या मांडून बसले आहेत. मात्र रविवारी झालेल्या पावसामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे हाल झाले आहेत. कर्मचाऱ्यांना तंबू ठोकू नसल्याने कर्मचाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. अशातच आज एसटी संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र या सुनावणीतही कोणताही तोडगा निघाला नसल्याने पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे. (फोटो अरुण पाटील)