घरराजकारणठाकरेंचे निकटवर्तीय रविंद्र फाटकही एकनाथ शिंदेच्या गोटात दाखल

ठाकरेंचे निकटवर्तीय रविंद्र फाटकही एकनाथ शिंदेच्या गोटात दाखल

Subscribe

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीयही आता एकनाथ शिंदेबरोबर जात आहेत. शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची संख्या आता ४१ वर गेली आहे. त्याचबरोबर मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड हे पण काही वेळात गुवाहाटीला पोहोचणार आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्या बंडखोरींनंतर आता शिवसेनेचे अस्तित्व पणाला लागले आहे. एक-एक आमदार (MLA) शिंदे यांच्या गोटात दाखल होत आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेले आमदार रविंद्र फाटकही (Ravindra Phatak) आता गुवाहाटीला (Guwahati) पोहोचले आहेत. ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीयही आता एकनाथ शिंदेबरोबर जात आहेत. शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची संख्या आता ४१ वर गेली आहे. त्याचबरोबर मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड हे पण काही वेळात गुवाहाटीला पोहोचणार आहेत. आमदार रविंद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनीही बंडखोर आमदारांना साथ दिल्याने ठाकरे कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरतला पाठवले होते. त फाटक आता शिंदेच्या गोटात दाखल झाले आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड यांनीही शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. ते गुवाहाटीच्या दिशेने निघाले असून काही वेळातच ते तिथे पोहचतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -