घरराजकारणसत्तेपासून लांब राहू न शकणाऱ्या राष्ट्रवादीची उद्विग्नता आणखी 15 वर्षं राहणार -...

सत्तेपासून लांब राहू न शकणाऱ्या राष्ट्रवादीची उद्विग्नता आणखी 15 वर्षं राहणार – शंभुराज देसाई

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून फार काळ लांब राहू शकत नाही. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरू आहे. मात्र पुढील 15 वर्षे त्यांना आम्ही सत्तेत येऊ देणार नाही, असा निर्धार राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने शंभुराज देसाई हे सातऱ्यात घरी आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात 2014ला झालेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पायउतार झाली. त्यावेळी भाजपाला 122 जागा मिळाल्या. पण सत्ता स्थापनेपासून भाजपा दूरच राहिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. तर, 2019च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. या पार्श्वभूमीवर शंभुराज देसाई यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

- Advertisement -

विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर शंभुराज देसाई यांनी शरसंधान केले. तुमचे सरकार असताना लोकशाही होती आणि आमचे सरकार येताच ती संपुष्टात आली, असे होऊ शकत नाही. सत्ता गेल्याची ही केवळ उद्विग्नता आहे. राष्ट्रवादी सत्तेपासून जास्त काळ लांब राहू शकत नसल्याने ही अगापाखड होत आहे, अशी टीका मंत्री देसाी यांनी केली. आम्ही राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षं सत्तेत येऊ देणार नाही, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

शेतकरी कर्जमाफीची पवारांकडून पोलखोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज, सोमवारी शिंदे-फडणवीस सरकारच्या शेतकरी कर्जमाफीची पोलखोल केली. भू-विकास बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. पण गेल्या 10 वर्षांमध्ये किमान एका शेतकऱ्याला तरी भू-विकास बँकेचे कर्ज मिळाले आहे का? भू-विकास बँक अस्तित्त्वात आहे, ही गोष्ट तरी तुम्हाला माहिती आहे का? गेल्या 25-30 वर्षांपासून भू-विकास बँकेने दिलेल्या कर्जांची वसुलीच झालेली नाही. अशा स्थितीत सरकार अशी घोषणा करत आहे, असे सांगतानाच लबाडाच्या घरचे आवताण, जरी असले तरी जेवल्याशिवाय खरे नसते, असा टोला पवारांनी लगावला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -