घरराजकारणठाकरे गटात इनकमिंग सुरू, सुषमा अंधारेंपाठोपाठ प्रशांत सुर्वेंच्या हाती शिवबंधन

ठाकरे गटात इनकमिंग सुरू, सुषमा अंधारेंपाठोपाठ प्रशांत सुर्वेंच्या हाती शिवबंधन

Subscribe

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे आता नेते आणि पदाधिकाऱ्यांचे इन-कमिंग आणि आऊट-गोईंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातूनच परिवर्तनवादी चळवळीच्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ प्रशांत सुर्वे यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमवेत ४० आमदारांनी शिवसेनेत वेगळा गट निर्माण केल्यानंतर हळूहळू शिवसेना खासदार, आजी-माजी नगरसेवक व अन्य पदाधिकारी या गटात सामील होऊ लागले आहेत. शिवाय, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ शिवसैनिक लीलाधर डाके यांच्या भेटीला

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा संघटना बांधणी हाती घेतली आहे. शिवसेना भवनात त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला असून आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. शिवाय, संघटना उभारणीत माजी आमदारांची मदतही मागितली आहे. याशिवाय काही नवे नेतेही शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचे पक्षात स्वागत केले.

- Advertisement -

त्यापाठोपाठ प्रशांत सुर्वे यांच्या हाती उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. सध्या शिंदे गटात असलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे ते घटस्फोटित पती आहेत. प्रशांत सुर्वे यांचा २००४ साली भावना गवळी यांच्याशी विवाह झाला होता. प्रशांत सुर्वे हे एयर इंडियात फ्लाइट कॅप्टन म्हणून कार्यरत होते. भावना गावळींशी विवाह झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली होती. २०१३ साली ते विभक्त झाले. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भावना गवळी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्यात प्रशांत सुर्वे पराभूत झाले होते. गवळी या शिंदे गटात सामील झाल्याने प्रशांत सुर्वे यांनी ठाकरे गटात प्रवेश करून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला.

हेही वाचा – आरे कारशेडविरोधी वनशक्ती संस्थेकडून याचिका दाखल, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -