घरराजकारणअनिल परब यांची ईडीकडून तब्बल ११ तास चौकशी

अनिल परब यांची ईडीकडून तब्बल ११ तास चौकशी

Subscribe

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayia) यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप केले होते. परबांच्या विरोधात काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Shiv Sena leader and transport Minister Anil Parab) यांची मंगळवारी ईडीने (ED) तब्बल ११ तास चौकशी केली. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांची चौकशी संपली. त्यानंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.

दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने अनिल परब यांना समन्स बजावले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११.२० च्या सुमारास अनिल परब इडीच्या कार्यालयात हजर झाले. संपूर्ण दिवस त्यांची चौकशी सुरू होती.  रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. बुधवारी पुन्हा ईडी परब यांची चौकशी करणार आहे.

- Advertisement -

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayia) यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप केले होते. परबांच्या विरोधात काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळी ईडीच्या कार्यालयात हजेरी न लावता अनिल परब हे शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे आपण चौकसीसाठी ईडी (ED) कार्यालयात जाऊ शकलो नव्हतो, असे परब यांनी सांगितले होते.

२०१७ मध्ये अनिल परब यांनी दापोली येथे एक प्लॉट खरेदी केला होता. प्लॉटच्या नोंदणीनंतर परब यांनी २०२० मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटी रुपयांना विकली. त्यानंतर या व्यवहारात अनेक प्रकारची फसवणूक झाल्याचा आरोप परब यांच्यावर करण्यात आला आहे. याच दरम्यान या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्टवरुन आरोप केला होता. साई रिसॉर्ट हा अनिल परब यांचा असून त्यांनी कोरोना काळात मंत्री पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या त्यांनी केला होता. साई रिसॉर्टचे मालक अनिल परब असून त्यांनी मालमत्ता सदानंद कदम यांना विकली. त्यायानंतर सदानंद कदमांचे पत्र उघड करुन सोमय्यांनी पुरावे सुद्धा दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -