घररायगडमुरुड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ३२ जागांसाठी ७१उमेदवार निवडणूक रिंगणात

मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ३२ जागांसाठी ७१उमेदवार निवडणूक रिंगणात

Subscribe

तालुक्यातील ५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूककरिता २८ नोव्हेंबर ते २डिसेंबर दरम्यान सदस्यपदासाठी ११७ तर सरपंच २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी गर्दी केली होती. तेलवडे ग्रामपंचायत मधुन ५सदस्यपदाचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी-प्रदिप गायकवाड आणि दवटे यांच्या कडून मागे घेण्यात आल्याने ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक होणार नाही. त्यामुळे चार ग्रामपंचायतकरिता ३२ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर ४ सरपंच पदाकरीता १३उमेदवार रिंगणात आहेत.

गणेश चोडणेकर: मुरुड

तालुक्यातील ५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूककरिता २८ नोव्हेंबर ते २डिसेंबर दरम्यान सदस्यपदासाठी ११७ तर सरपंच २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी गर्दी केली होती. तेलवडे ग्रामपंचायत मधुन ५सदस्यपदाचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी-प्रदिप गायकवाड आणि दवटे यांच्या कडून मागे घेण्यात आल्याने ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक होणार नाही. त्यामुळे चार ग्रामपंचायतकरिता ३२ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर ४ सरपंच पदाकरीता १३उमेदवार रिंगणात आहेत. येत्या १८ डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे.
मुरुड तहसीलदार कार्यालया समोरील दरबार हॉलमध्ये सकाळी काकळघर ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी आशिष मुकणे यांच्या कडून २० ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता उमेदवारांनी तर सरपंचपदा करिता ४उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. ९ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता १९उमेदवार तर ४सरपंचपदाकरिता उमेदवार रिंगणात उभे आहेत.

- Advertisement -

९ग्रामपंचायत सदस्यांसाठी २३उमेदवार
कोर्लेई ग्रामपंचायतमधून १४ सदस्यपदांसाठी तर ४ सरपंच पदाकरीता उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुनेश्वर यांच्याकडून मागे घेण्यात आला. ९ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता २३उमेदवार तर सरपंच पदाकरीता ४उमेदवार रिंगणात आहेत. वावडुंगी ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी २ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी साहिल मुजावर आणि मनोज पुलेकर यांच्याकडून मागे घेण्यात आला. ७ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता ९उमेदवारी अर्ज व सरपंच पदाकरीता २, उमेदवार रिंगणात आहेत.

उमेदवारांना चिन्हांचे वाटप
वेळास्ते ग्रामपंचायत मधुन सदस्यपदासाठी ४तर सरपंच पदाकरीता ३उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी -राकेश पाटील तसेच प्रकाश आरेकर यांच्याकडून घेण्यात आले. ७ग्रामपंचायत सदस्यपदांकरिता १४उमेदवार तर सरपंच पदाकरीता २ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहन शिंदे तसेच निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली चार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सरपंच पदाकरीता उमेदवार आणि सदस्य पदाकरीता उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -