घररायगडखोपोलीत वाहतूक पोलिसांची कारवाई

खोपोलीत वाहतूक पोलिसांची कारवाई

Subscribe

खोपोली शिळफाटा इंदिरा चौकातील अरूंद रस्त्यावरून वाहनांची अत्यंत वर्दळ असते.दररोज होणार्‍या वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दुरे आणि पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष पहाणी करून इंदिरा चौकात बॅरिकेटस् लावून अवजड वाहतुक वळविल्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसविण्यात यश आले होते. मात्र चारचाकी,मोठी अवजड वाहने बिनधास्तपणे नो एंट्रीतून वाहने चालवित असल्याने वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी बुधवारी सकाळपासून नो एंट्रीतून येणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.

खोपोली: शिळफाटा इंदिरा चौकातील अरूंद रस्त्यावरून वाहनांची अत्यंत वर्दळ असते.दररोज होणार्‍या वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दुरे आणि पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष पहाणी करून इंदिरा चौकात बॅरिकेटस् लावून अवजड वाहतुक वळविल्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसविण्यात यश आले होते. मात्र चारचाकी,मोठी अवजड वाहने बिनधास्तपणे नो एंट्रीतून वाहने चालवित असल्याने वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी बुधवारी सकाळपासून नो एंट्रीतून येणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.
शिळफाटा इंदीरा चौकातून पुण्याहून मुंबईकडे जाणारा तसेच शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या येथेन मुंबईकडे जाणाया एकेरी महामार्ग असला तरी दररोज सकाळी १ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहनांची अत्यंत वर्दळ असल्यामुळे शिळफाटा जाम होवू जातो. वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासक दुरे आणि पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी करून इंदिरा चौकात बॅरिकेट लावून अवजड वाहतूक दुध डेअरी मार्गे खोपोलीच्या दिशेने वळविल्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसविण्यात यश आले होते. वाहतुक पोलिस इंदिरा चौकात लक्ष ठेवून सतत उभेच असतात, मात्र काही अंतराचा पल्ला चुकविण्यासाठी वाहतूक पोलिसांची नजर चुकवून नो एंट्रीतून वाहने बिनधास्तपणे घेवून जात असल्यामूळे बुधवारी वाहतुक पोलिस प्रशांत बोंबे, धम्मानंद वावळ, धिरज तुपे, प्रविण रणमाळे ही वाहतुक पोलिसांची टिमने नो एंट्रीतून येणार्‍या बेकायदेशीर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर नो एंट्रीतून येणार्‍या वाहनांवर कारवाई सुरू असल्याने व्यापारी,स्थानिक नागरिकांनी वाहतुक पोलिसांचे कौतुक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -