घररायगडशिवरायांच्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी ‘कर्जत बंद’ला मोठा प्रतिसाद

शिवरायांच्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी ‘कर्जत बंद’ला मोठा प्रतिसाद

Subscribe

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहरातील शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांनी पुकारलेल्या ‘कर्जत बंद’ला व्यापारी, जनता तसेच सर्व स्तरातील शहरवासीयांनी मोठा प्रतिसाद देत बंद यशस्वी केला.

 

कर्जत: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहरातील शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांनी पुकारलेल्या ‘कर्जत बंद’ला व्यापारी, जनता तसेच सर्व स्तरातील शहरवासीयांनी मोठा प्रतिसाद देत बंद यशस्वी केला. सकल मराठा समाज कर्जतच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला होता.
इतिहासाचे अभ्यासक वसंत कोळंबे, माजी सरपंच मधुकर घारे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शंकर थोरवे, अनिल भोसले, दिपक भालेराव आदींनी आपल्या मनोगतातून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या राज्यपाल कोश्यारी आणि अन्य नेत्यांचा जाहीर निषेध केला. त्यानंतर बाजारपेठेतून निषेध फेरी काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आणि तेथेही जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शिवप्रेमी संघटनांनी पुकारलेल्या बंदला कर्जत मधील व्यापार्‍यांनी आपले व्यवहार शंभर टक्के बंद ठेऊन उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
या प्रसंगी माजी सभापती प्रदीप ठाकरे, अनिल भोसले, जगदीश ठाकरे, सोमनाथ पालकर, रत्नाकर बडेकर, सोमनाथ ठोंबरे, ज्ञानेश्वर भालीवडे, मुकेश पाटील, संतोष पाटील, संतोष थोरवे, भानुदास मिसाळ, अंकुश मोधळे, रवी मोधळे, कैलास म्हामले, सुहास वांजळे, अरुण देशमुख, केशव वांजळे, नैनेश दिघे, मनोज लाड, निखिल लाड, प्रमोद लाड, अ‍ॅड. भाऊ मोरे, शेखर शहासने नदिम खान, अमीर मणियार, संजय धामनसे आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

- Advertisement -

घोषणांनी परिसर दणाणला
निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ सर्व शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांनतर राज्यपाल कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, सुधांशु त्रिवेदी, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्वांचा जोरदार घोषणा देऊन निषेध केला तसेच ’राज्यपाल हटाव’ चा नारा देत घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -