घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातमुळे 'आप'ला मिळाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा; केजरीवालांनी मानले आभार

गुजरातमुळे ‘आप’ला मिळाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा; केजरीवालांनी मानले आभार

Subscribe

राजकीय पक्ष म्हणून नोंद होण्यासाठी काही निकष आहेत. पहिला निकष म्हणजे त्या पक्षाचे लोकसभेत ४ सदस्य असावेत. लोकसभा निवडणुकीत त्याला ६ टक्के मते मिळायला हवीत. तसेच ४ राज्यातील निवडणुकीत त्या पक्षाला ६ टक्क्याहून अधिक मते मिळायला हवीत. 

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीला (आप) गुरुवारी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. गुजरातच्या निवडणुकीत मिळाले्या मतांमुळे आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. त्यामुळे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले.

कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी चार राज्यातील निवडणुकीत ६ टक्के मत मिळायला हवीत. गुजरात निवडणुकीत आपने हा निकष पूर्ण केला. आठवा राष्ट्रीय पक्ष म्हणून आपची नोंद झाली आहे. अवघ्या १० वर्षात आपने राष्ट्रीय पक्षाच्या यादीत आपली नोंद केली आहे. याआधी काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसी पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंद झाली आहे.

- Advertisement -

राजकीय पक्ष म्हणून नोंद होण्यासाठी काही निकष आहेत. पहिला निकष म्हणजे त्या पक्षाचे लोकसभेत ४ सदस्य असावेत. लोकसभा निवडणुकीत त्याला ६ टक्के मते मिळायला हवीत. तसेच ४ राज्यातील निवडणुकीत त्या पक्षाला ६ टक्क्याहून अधिक मते मिळायला हवीत.

दिल्ली, पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. दिल्ली महापालिकेतही आपची सत्ता आली आहे. गोवा निवडणुकीत आपला दोन जागा मिळाल्या व तेथे त्यांना ६.७७ टक्के मते मिळाली. गुजरात निवडणुकीत आपला १३ टक्के मते मिळाली. त्यामुळे आपने राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी लागणारा निकष आपने पूर्ण केला.

- Advertisement -

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आपचे अध्यक्ष केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्याला भेदण्यासाठी आम्ही गुजरातची निवडणूक लढवली. प्रचार करताना आम्ही कोणाला शिव्या दिल्या नाहीत. आम्ही केवळ जनसेवेचा मुद्दा जनतेसमोर ठेवला. त्याआधारावरच जनतेने आम्हाला मतदान केले. गुजरातच्या मतदारांमुळेच आम्हाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आले. प्रचार करतानाही गुजरातच्या जनतेने आपला खूप प्रेम दिले. त्यासाठी गुजरातच्या जनतेचे आभार, असे केजरीवाल म्हणाले.

गुजरातमध्ये आपने जोरदार प्रचार केला असली तरी त्यांना ५ जागांवरच विजय मिळाला आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये तर आपचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -