घररायगडखोपोलीत शासकीय दाखले वाटप उपक्रम

खोपोलीत शासकीय दाखले वाटप उपक्रम

Subscribe

बारावी, दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची कॉलेज प्रवेशाची लगबग सुरू होते. प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थीं मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात गर्दी करतात. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधत खोपोली महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या पुढाकाराने केएमसी कॉलेजच्या सभागृहात आयोजित शासकीय दाखले वाटप शिबीरात विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणारे तसेच जेष्ठ नागरिकांसाठी वयाचा दाखले देण्यात आले.

खोपोली: बारावी, दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची कॉलेज प्रवेशाची लगबग सुरू होते. प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थीं मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात गर्दी करतात. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधत खोपोली महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या पुढाकाराने केएमसी कॉलेजच्या सभागृहात आयोजित शासकीय दाखले वाटप शिबीरात विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणारे तसेच जेष्ठ नागरिकांसाठी वयाचा दाखले देण्यात आले.
शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,राष्ट्रवादीचे खालापूर तालुकाध्यक्ष नरेश पाटील,निवडणूक नायब तहसीलदार दशरथ भोईर, प्राचार्य डॉ.प्रताप पाटील,मंडळ अधिकारी संदेश पानसरे,मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडेकर,साजगांवचे उपसरपंच अजित देशमुख, माजी सरपंच भाऊ गायकवाड,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनेष यादव,युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील,माजी नगरसेवक समीर मसुरकर,नगरसेविका केविना गायकवाड,युवकचे उपाध्यक्ष सचिन पवार,सल्लागार विनायक तेलवणे, विनोद रजपूत,जिल्हा महिला सरचिटणीस अंजू सरकार, सुजाता यादव,जयश्री डोंगरे,दिपाली भोसले,वैशाली भोसले, प्रज्ञा महाडिक,शोभा फाळे,अश्विनी ढोळे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी ३०० उत्पन्नाचे दाखले , १७जातीचे दाखले , ४५ डोमासाईल दाखले, ३ नॉन क्रिमीनल दाखले, १४ ज्येष्ठ नागरिक दाखले,४० मतदान ओळखपत्र आदी विविध दाखल्याचे अर्ज भरून घेत पूर्तता करण्यात आली.

परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी शासकीय दाखले जमा करण्यासाठी विद्यार्थी,पालक यांची दमछाक होते त्यामुळेच ‘शासन आपल्या दारी’या अभियना अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधत माजी आमदार सुरेश लाड,माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित केला होता.तहसीलदार आयुब तांबोली,नायब तहसिलदार सुधाकर राठोड आणि सर्व टिमने सहकार्य केल्याबद्दल आभार.
– सुवर्णा मोरे
महिला शहर अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,खोपोली

- Advertisement -

पक्षाच्यावतीने महिला शहर अध्यक्षा मोरे नेहमीच विविध कार्यक्रम शहरात राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. शैक्षणिक प्रवेशासाठी शासकीय दाखले जमा करण्यासाठी विद्यार्थी,पालक यांची धावपळ होत असते ही महत्वाची गरज ओळखून विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला शासकीय दाखले वाटप शिबीर कौतुकास्पद
– नरेश पाटील
तालुकाध्यक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -