महामार्गाचे काम दर्जेदार करा; आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाचे आणि लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी करतानाच या महामार्गावर प्रत्येकी ५० ते १०० किमी अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारणी झाली पाहिजे अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत त्यांनी या महत्वपूर्ण विषयावर शासनाचे लक्ष वेधले.

Pune, India - June 03 2018: The Mumbai Pune Expressway near Pune India.

पनवेल: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाचे आणि लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी करतानाच या महामार्गावर प्रत्येकी ५० ते १०० किमी अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारणी झाली पाहिजे अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत त्यांनी या महत्वपूर्ण विषयावर शासनाचे लक्ष वेधले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना आणि या आश्वासनाची पूर्तता करण्यास एनएचएआय अपयशी ठरले. तसेच १२ वर्षांपासून या महामार्गाचे काम प्रलंबित असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या कामांबाबत मा. उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे जानेवारी २०२३ मध्ये निदर्शनास आले असल्याचे आमदार ठाकूर यांनी म्हटले आहे.
पनवेल ते इंदापूर मधील सुरुवातीचा ० ते ४२ कि.मी. च्या पट्टयाचे काम पुर्ण झाल्याचे प्रतिज्ञापत्र एनएचएआयने मा. न्यायालयासमोर सादर केले असून याच मार्गादरम्यानच्या ४२.३ कि.मी. ते ८४.६ कि.मी. च्या रस्त्याचे कंत्राट देण्यात आलेल्या मेसर्स कल्याण टोल इन्फ्रा लि. या कंपनीने कोणतेही काम केलेले नाही. या महामार्गाच्या कामाची जबाबदारी ही राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची असून काम मोठ्या प्रमाणात अपूर्ण असतानाही तसेच राज्य शासनाकडून या विषयी प्राधान्याने कोणतीही कार्यवाही होत नसतानाही या संपूर्ण टप्प्याचे काम मे २०२३ पर्यंत पुर्ण होईल अशा स्वरुपाचे प्रतिज्ञापत्र मुख्य सरकारी वकिल यांनी मा. न्यायालयात सादर केले आहे.

 ट्रामा सेंटर उभारण्याची आवश्यकता

या महामार्गाचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयांमुळे येथे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे असताना या महामार्गावर अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तात्काळ मिळण्याबाबत प्रत्येक ५० किंवा १०० कि.मी. अंतरावर एक ट्रामा सेंटर उभारण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून महामार्गाची प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करुन निकृष्ट काम करणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत तसेच ट्रामा केअर सेंटर उभारणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा सवाल या तारांकित प्रश्नातून शासनाला केला.

मुंबई गोवा महामार्गाचे इंदापूर ते करोडी परशुराम घाट (कि.मी.८४/०० ते कि.मी. २०५/४००) या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असलेल्या लांबीमध्ये कि.मी. १२६.५०० मौजे महाड येथे ट्रामा सेंटर उपलब्ध आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे खारपाडा टोल नाका येथे १ व सुकेळी घाट येथे ०१ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तात्काळ मिळण्याबाबत प्रत्येक ५० किंवा १०० कि.मी. अंतरावर एक ट्रामा सेंटर उभारण्याची गरज आहे.
– रविंद्र चव्हाण,
मंत्री, सार्वजनिक बांधकाम खाते