घररायगडजिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याकडून रायगडावरील विकासकामांची पाहणी

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याकडून रायगडावरील विकासकामांची पाहणी

Subscribe

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी तालुक्यातील चवदारतळे येथे भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्याच प्रमाणे त्यांनी किल्ले रायगडावर सुरु असलेल्या विकासकामांची देखील माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी आणि मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रथम ऐतिहासिक चवदारतळे येथे भेट दिली.

महाड: जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी तालुक्यातील चवदारतळे येथे भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्याच प्रमाणे त्यांनी किल्ले रायगडावर सुरु असलेल्या विकासकामांची देखील माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी आणि मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रथम ऐतिहासिक चवदारतळे येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी येथील तहसील कार्यालयामधील मतदान केंद्राचा आढावा घेत तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांशी संवाद साधला.
यावेळी महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई, सुधीर शेठ आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी रायगड विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या रायगड किल्ल्यावरील विविध विकासकामांची जिल्हाधिकारी पाहणी केली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे सपत्नीक दर्शनही घेतले. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, कार्यकारी अभियंता महेश नामदे, सहाय्यक अभियंता श्री.स्वप्निल बुर्ले, रायगड विकास प्राधिकरणाचे श्री.विशाल भामरे आदि उपस्थित होते.

 महाड पत्रकार संघाकडून स्वागत
महाड पत्रकार संघाकडून नव जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, योगेश भामरे, उदय सावंत, सिकंदर अनवारे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. योगेश म्हसे यांनी महाड ही सामाजिक क्रांतीची प्रेरणा असलेली भूमी असल्याने याठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करून कामाची सुरवात केल्याचे डॉ.म्हसे यांनी सांगितले. तसेच शहरातील स्वच्छतेचे कौतुकही केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -