घररायगडजंजिरा मुक्ती दिन उत्साहात साजरा; मुख्याधिकरी पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

जंजिरा मुक्ती दिन उत्साहात साजरा; मुख्याधिकरी पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Subscribe

३१ जानेवारी १९४८ रोजी जंजिर्‍याच्या नवाबाने भारताच्या शामिल नाम्यावर सही केल्याने हे जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते.तेव्हापासून हा दिवस जंजिरा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो.यासाठी रायगड प्रेस क्लब आणि मुरुड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आझाद चौकात मुख्याधिकरी तथा प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मुरुड:  ३१ जानेवारी १९४८ रोजी जंजिर्‍याच्या नवाबाने भारताच्या शामिल नाम्यावर सही केल्याने हे जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते.तेव्हापासून हा दिवस जंजिरा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो.यासाठी रायगड प्रेस क्लब आणि मुरुड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आझाद चौकात मुख्याधिकरी तथा प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुरुड ,श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात जंजिरा नवाबांची सत्ता होती.या तिन्ही तालुक्याचा कारभार नवाब सरकार मुरुड येथील राजवाड्यातून चालवत असत.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिरा संस्थान सुद्धा भारतात विलीन व्हावे यासाठी आंदोलन झाली.याचाच परिणाम म्हणून नवाब भारतात विलीन व्हावे लागले होते.
यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे,माजी अध्यक्ष मेघराज जाधव, पोलीस उप निरीक्षक मुर्तुझा शेख, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अजीत कासार, माजी नगरसेवक प्रमोद भायदे,पांडुरंग आरेकर,व्यापारी बँकेचे चेरमन संदीप पाटील,श्रीराम बँकेचे चेरमन दिलीप जोशी, माजी तहसीलदार नयन कर्णिक,मुरुड नगरपरिषद प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर,वसंतराव नाईक महाविद्यलयालयाचे उप प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण,मुख्याध्यापक सरोज राणे,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे,माजी नगरसेविका युगा ठाकूर, मुग्धा जोशी, वासंती उमरोटकर,समाजसेवक अरविंद गायकर,मुरुड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सिराज शेख,गणेश चोडणेकर, नितीन शेडगे, माजी अध्यक्ष संजय करडे तसेच सर एस ए हायस्कूल जुनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अंजुमन इसलाम डिग्री महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार संजय करडे यांनी व्यक्त केले.

पत्रकार संघ एक ऐतिहासिक कार्यक्रम साजरा करताना नगरपरिषदेला सोबत घेऊन हा कार्यक्रम करते याचा आम्हाला रास्त अभिमान आहे.पत्रकार संघाचे प्रयत्न सुरु आहेत की, सदरचा कार्यक्रम हा शासनाने शासकीय पद्धतीने साजरा करावा. माझ्या त्यासाठी शुभेच्छा असून त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळो.
– पंकज भुसे ,
मुख्याधिकारी, मुरुड-जंजिरा नगर परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -