घररायगडखालापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ओडीएफ‘ दर्जा

खालापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ओडीएफ‘ दर्जा

Subscribe

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून कर्मचार्‍यांचा सन्मान

चौक-: खालापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘ओडीएफ‘ दर्जा मिळवण्यार्‍या मानकरी ठरल्या आहेत. हागणदारी मुक्त दर्जा सर्व ग्रामपंचायतीने मिळविल्याने खालापूर पंचायत समिती ‘ओडीएफ‘ प्लस नामावलीत पोहोचली आहे. (All Gram Panchayats in Khalapur taluka have ‘ODF’ status under Swachh Bharat Mission)

रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे ‘ओडीएफ‘ प्लस दर्जा मिळवल्या बद्दल खालापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सी.एच.राजपूत यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

स्वच्छ गाव, स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ भारत ही स्वच्छ भारत मिशनची व्याख्या असल्याने हागणदारी मुक्त अभियानामध्ये तीन टप्पे ग्रामपंचायतींना निश्चित करून दिले होते. त्यात हागणदारी मुक्त उद्दिष्टमन, उज्वल आणि यशस्वी असे तीन टप्पे होते. या तिन्ही टप्प्यांमध्ये प्रामुख्याने प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असले पाहिजे, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय असले पाहिजे, प्रत्येक शाळा अंगणवाडी केंद्रावर शौचालय असले पाहिजे आणि गावात सांडपाणी व्यवस्थापन किंवा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया सुविधा असली पाहिजे अशा अटी होत्या. त्या सर्व अटी खालापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायत यांनी पुर्ण केल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय असले पाहिजे. प्रत्येक शाळा अंगणवाडी केंद्रावर शौचालय असले पाहिजे आणि गावात सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्था प्रक्रिया सुविधा असली पाहिजे, अशा अटी होत्या त्या अटी या सर्व ग्रामपंचायतींनी पुर्ण केल्या आहेत. ‘ओडीएफ‘ पुढील दर्जा मिळवण्यासाठी इतर अटी प्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यांची स्वतंत्र प्रक्रिया व्यवस्थापन बंधनकारक केली आहे. ‘ओडीएफ‘ प्लस दर्जा मिळवण्यासाठी या सर्व अटी शिवाय शौचालय असलेल्या ठिकाणी भिंतीवर स्वच्छतेचे संदेश, परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्याचे संदेश पेटींग करून घेण्याची अट होती. याला ठिकठिकाणी गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने गाव हागणदारी मुक्त होण्यास मदत झाली आहे. खालापूर तालुक्यात ४५ ग्रामपंचायती असून प्रत्येक ग्रामपंचायत हागणदारीमुक्त होण्यासाठी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक यांच्या सहकार्याने खालापूर तालुका हागणदारी मुक्त अभियानात ‘ओडीएफ‘ प्लस दर्जा मिळण्यात यशस्वी ठरला आहेत.

हागणदारी मुक्त गाव अभियानासाठी गटविकास अधिकारी संदीप कराड, सहायक गटविकास अधिकारी राजपूत, विस्तार अधिकारी अधिकारी महादेव शिंदे, शैलेंद्र तांडेल व पंचायत समिती संदीप मोगारे, रविकिरण राठोड यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -