घररायगडनेमको कंपनीमधील कामगारांच्या समस्यांवर भाजपा आक्रमक, आ.प्रशांत ठाकूर यांचे कंपनीला निवेदन

नेमको कंपनीमधील कामगारांच्या समस्यांवर भाजपा आक्रमक, आ.प्रशांत ठाकूर यांचे कंपनीला निवेदन

Subscribe

नेमको हा कारखाना खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असून या कारखान्यात जवळपास १५४ कामगार काम करत आहेत. कारखान्यात बाहेरील कामगार व स्थानिक कामगार याच्यात दूजाभावाची वागणूक देत असल्याने या वागणुकीत स्थानिकांवर अन्याय होत आहे.

खालापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात भुमीपुत्रावर कारखाना व्यवस्थापनाकडून अन्याय होत असतो. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भुमीपुत्र,लोकप्रतिनिधी, राजकीय नेते नेहमीच आक्रमक होताना पहायला मिळते. होराळे ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या नेमको कंपनीच्या कारभाराबाबत खालापूर भाजपा आक्रमक झाली आहे.

भुमिपुत्रावर अन्याय करू नका. तसेच नोकरी भुमिपुत्रांना प्राधान्य दया अशा आशयाचे आमदार प्रशांत ठाकूर याचे मागणी पत्र खालापूर भाजपाने निमको कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे. या पत्राची कारखानदार व्यवस्थापनाने दखल न घेतल्यास भाजपा स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, कोषाध्यक्ष सनी यादव, अंकुश मोरे, श्रीकांत भोईर, महेश कडू नागेश पाटील, परेश खोपकर आदी प्रमुख उपस्थित होते.
नेमको हा कारखाना खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असून या कारखान्यात जवळपास १५४ कामगार काम करत आहेत. कारखान्यात बाहेरील कामगार व स्थानिक कामगार याच्यात दूजाभावाची वागणूक देत असल्याने या वागणुकीत स्थानिकांवर अन्याय होत आहे. या स्थानिक कामगारांनी आपल्या व्यथा भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांरजे मांडल्या.

- Advertisement -

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी १४ फेब्रुवारी रोजी नेमको व्यवस्थापनाशी चर्चा करीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवेदनाचे पत्र दिले. स्थानिक कामगारांचे वेतन व बाहेरील कामगारांचे वेतन यामध्ये तफावत असणे, कामगारांना पगाराची स्लिप न देणे, बोनस न देणे तसेच इतर विविध मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशा विविध विषयांवर चर्चा करत या सर्व तक्रारीवर लवकरच तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली.
या वेळी व्यवस्थापनाकडून आपले मत मांडताना पांडे म्हणाले की, या निवेदनाची दखल घेऊन माझ्या वरिष्ठांशी व कारखाना मालकांशी लवकरच चर्चा करू. च्यानंतर याची सर्व माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी देऊ.

नोकरीमध्ये स्थानिक ८० टक्के नागरिकांना प्राधान्य दयावे. तसेच स्थानिक नोकरदार व बाहेरील नोकरदार याच्यातील असलेला पगार आणि बोनसमध्ये असलेली तफावत दूर करून सर्वांना समान पगार, बोनस दयावा
– विठ्ठल मोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष

- Advertisement -

कंपनीतील स्थानिक कामगारांच्या अनेक तक्रारी आल्याने या तक्रारीच्या अनुषंगाने नेमको व्यवस्थापनाशी भेट घेऊन स्थानिक कामगारांच्या तक्रारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवेदन पत्राद्वारे व चर्चेतून मांडल्या आहेत. या तक्रारी कंपनी व्यवस्थापनाकडून लवकरात लवकर सोडवल्या न गेल्यास आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून होणार्‍या सर्व घडामोडींना कंपनी व्यवस्थापक जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
– सनी यादव, कोषाध्यक्ष, भाजपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -