घररायगडऑनलाइन अभ्यासामुळे मुलांमध्ये दृष्टी दोषाचे प्रमाण वाढले

ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांमध्ये दृष्टी दोषाचे प्रमाण वाढले

Subscribe

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या २१७ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर डिजिटलमुळे ताण येऊन त्रास झाल्याचे दिसून आले. यामध्ये २६ टक्के सौम्य, १३ टक्के मध्यम आणि ११ टक्के विद्यार्थ्यांना खाज सुटणे आणि डोकेदुखी अशी सर्वात सामान्य लक्षणे दिसून आली.

ऑनलाइन शिक्षणासाठी डिजिटल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोषाचे प्रमाण वाढत असल्याचे नवीन पनवेल येथील आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातील (ओपीडी) २४७ विद्यार्थ्यांपैकी ७९ विद्यार्थ्यांमध्ये ‘रिफ्रेक्टिव्ह एरर’दृष्टीदोष असल्याचे आढळून आले. जे १०-१५ टक्क्यांच्या सामान्य प्रवृत्तीच्या तुलनेत ३२ टक्के होते, असे नवीन पनवेल येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.’रिफ्रेक्टिव्ह एरर’ दृष्टिदोषामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवरील दृष्टी अंधुक बनते आणि सामान्य लक्षणांमध्ये डोकेदुखीचा समावेश होतो आणि त्यानंतर सारखे डिजिटल राहिल्यामुळे डोळ्यावर आणखीन ताण (डिजटल आय स्ट्रेन) येतो.

इंडियन जर्नल ऑफ ऑप्थाल्मोलॉजीमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या दुसर्‍या अभ्यासानुसार, सर्वेक्षणात भाग घेतलेल्या २१७ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर डिजिटलमुळे ताण येऊन त्रास झाल्याचे दिसून आले. यामध्ये २६ टक्के सौम्य, १३ टक्के मध्यम आणि ११ टक्के विद्यार्थ्यांना खाज सुटणे आणि डोकेदुखी अशी सर्वात सामान्य लक्षणे दिसून आली. शाळा बंद झाल्यानंतर महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन अध्यापन किंवा ई-लर्निंगमुळे ३६ टक्के विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यात घालवलेला सरासरी वेळ दिवसाला ५ तासांपर्यंत वाढला आहे.

- Advertisement -

श्री कांची कामकोटी मेडिकल ट्रस्ट या सामाजिक उपक्रमाद्वारे भारतात १२ ठिकाणी रुग्णालये चालवली जातात त्यापैकी एक रुग्णालय पनवेल येथे सुरू करण्यात आलेले आहे. आर जे शंकरा आय हॉस्पिटलच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अंकिता यांनी सांगितले की, इतर अनेक अभ्यासानुसार जे विद्यार्थी दररोज ४ ते ५ तास डिजिटल उपकरणांवर वेळ घालवणार्‍या मुलांमध्ये डिजिटलमुळे डोळ्यावर ताण येण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढलेला दिसतो. यावर लवकर उपाय केल्यास व्हिजन थेरपी डिजिटल राहण्यामुळे डोळ्यांवरील वाढलेल्या ताणाच्या लक्षणे रोखण्यास मदत होऊ शकते.

व्हिजन थेरपीमध्ये विशेष चष्मा, फिल्टर, प्रिझम आणि संगणक सहाय्यक व्हिजन प्रोग्रामच्या सहाय्याने काही आठवडे किंवा महिन्यांच्या कालावधीत कार्यालयात आणि घर-आधारित व्यायामांची मालिका याचा समावेश असतो.ज्यामुळे डोळ्यांचे लक्ष केंद्रित करणे, समन्वय सुधारते.

- Advertisement -

– डॉ. अंकिता, नेत्ररोग तज्ज्ञ, आर जे शंकरा आय हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -