Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर रायगड दिघी पोर्टमधील कंपनीला विरोध; स्थानिक ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

दिघी पोर्टमधील कंपनीला विरोध; स्थानिक ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

Subscribe

दिघी पोर्ट येथे काही वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या व्हेरिटास पॉलिकेम या रासायनिक कंपनीला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला होता. अनेक तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत २०२० मध्ये जनसुनावणी घेतली यामध्ये उपस्थित पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला होता तरीही आता तीन वर्षांनंतर ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे कल्पना न देता या कंपनीच्या स्थापनेचे पहिले पाऊल कंपनी प्रशासनाने टाकले आणि गुरुवारी दिघी पोर्टमध्ये या कंपनीच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाल्याचे ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थानी ही कंपनी येथे चालू करण्याबाब तीव्र विरोध दर्शविला. येत्या काही दिवसात या कंपनीच्या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचे ग्रामस्थानी पत्रकारांना सांगितले.

बोर्ली पंचतन: दिघी पोर्ट येथे काही वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या व्हेरिटास पॉलिकेम या रासायनिक कंपनीला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला होता. अनेक तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत २०२० मध्ये जनसुनावणी घेतली यामध्ये उपस्थित पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला होता तरीही आता तीन वर्षांनंतर ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे कल्पना न देता या कंपनीच्या स्थापनेचे पहिले पाऊल कंपनी प्रशासनाने टाकले आणि गुरुवारी दिघी पोर्टमध्ये या कंपनीच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाल्याचे ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थानी ही कंपनी येथे चालू करण्याबाब तीव्र विरोध दर्शविला. येत्या काही दिवसात या कंपनीच्या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचे ग्रामस्थानी पत्रकारांना सांगितले.
दिघी पोर्ट हे श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदरमध्ये चालू झाले आहे. काही महिन्यांपूर्वी अदानी समूहाकडे या दिघी पोर्टची सूत्र गेल्यानंतर या पोर्टच्या हालचालीना हळूहळू वेग धरू लागला आहे. याच दिघी पोर्टमध्ये या आधी व्हेरिटास या कंपनी बस्तान बसविण्यासाठी सज्ज होती परंतु या कंपनीतील संभाव्य प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. शेती, बागायतींवरही परिणाम होणार आहे. शिवाय या परिसरातील प्रमुख व्यवसाय हा मच्छिमारी असल्याने या प्रकल्पामुळे मच्छिमारी व्यवसायावरही गदा येणार असल्याने या कंपनीला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विरोध केला. यावर ऑक्टोबर २०२० मध्ये याबाबत जिल्हा प्रशासनाने यावर जनसुनावणी घेतली यातही पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला, परंतु त्यानंतर ३ वर्षे या कंपनीबाबत शांतता होती. गुरुवारी अचानक व्हेरिटास पॉलिकेम कंपनीच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला आणि कंपनी सुरू करण्याबाबत पहिले पाऊल व्यवस्थापनानेे उचलले. ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाला कचराकुंडी दाखवत केलेल्या कंपनीच्या भूमीपूजनामळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी प्रमुख पदाधिकारी एकत्र येत या कंपनीचा निषेध नोंदवित हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. दोन दिवसांत याबाबत तातडीची ग्रामसभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे दिघी ग्रामपंचायतीचे सरपंच विपुल गोरीवले यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी दिघी गावप्रमुख हरिदास पाटील, मुस्लिम समाज सचिव अमन हदादी, कोळी समाज माजी अध्यक्ष जनार्दन गोवारी, मच्छिमार सोसायटी चेअरमन लक्ष्मण मेंदाडकर, माजी सभापती देविदास कावळे, उपसरपंच गोपाळ मेंदाडकर, मंगेश गुणाजी, पांडुरंग मेंदाडकर तसेच विविध समाजातील स्थानिक ग्रामस्थ प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी उपस्थित होते.

दिघी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या विरोधाला डावलून दिघी पोर्ट मध्ये लादत असलेल्या व्हेरिटास पॉलिकेम या घातक कंपनीमध्ये असलेल्या प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका होणार आहे, मच्छिमारी व्यवसायावर देखील परिणाम होणार असल्याने अशा घातक प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे, असा घातक प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही.
– किरण कांदेकर,
अध्यक्ष, दिघी कोळी समाज

- Advertisement -

आम्ही विकासाच्या विरोधात केव्हाच नाहीत परंतु आम्ही २ वर्षांपूर्वी या प्रकल्पाला विरोध केला आहे आणि यापुढेही अशा घातक प्रकल्पास आमचा नेहमीच विरोध राहील.
-अमन हदादी,
सचिव, मुस्लिम समाज दिघी

व्हेरिटास कंपनीला ग्रामस्थांनी ऑक्टोबर २०२० विरोध केला असतानाही कंपनीला कोणी परवानगी दिली? ग्रामस्थांच्या जीविताला धोका पोहचविणारे प्रकल्प आम्हाला याठिकाणी नकोत, यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. येत्या मंगळवारी याबाबत ग्रामसभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार.
-विपुल गोरीवले,
सरपंच दिघी ग्रुप ग्रामपंचायत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -