घररायगडवाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता; शीतपेयांना मोठ्या प्रमाणात मागणी

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता; शीतपेयांना मोठ्या प्रमाणात मागणी

Subscribe

दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री काही भागात पुन्हा थंडगार हवा अशा बदलत्या वातावरणामुळे रायगडकर हैराण झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून दिवसाचे तापमान ३३ डिग्री सेल्सीअसवर गेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकाराच्या मते शहरात सध्या हिट स्ट्रोक सुरू आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असून, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. प्रचंड उष्मेने नागरिक हैराण झाले आहे. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिक शीतपेयांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे. त्यामुळे थंडगार लिंबू सरबत, आईस्क्रीम, ज्युस, कुल्फी यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. आईस्क्रीम पार्लर ते रस्त्यावरच्या गाड्यांवरही नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.

अलिबाग:  दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री काही भागात पुन्हा थंडगार हवा अशा बदलत्या वातावरणामुळे रायगडकर हैराण झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून दिवसाचे तापमान ३३ डिग्री सेल्सीअसवर गेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकाराच्या मते शहरात सध्या हिट स्ट्रोक सुरू आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असून, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. प्रचंड उष्मेने नागरिक हैराण झाले आहे. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिक शीतपेयांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे. त्यामुळे थंडगार लिंबू सरबत, आईस्क्रीम, ज्युस, कुल्फी यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. आईस्क्रीम पार्लर ते रस्त्यावरच्या गाड्यांवरही नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.

रुग्णांनी काळजी घेण्याचे आवाहन
सध्या ‘हिट स्ट्रोक’ आणि डिहायड्रेशन फिवर सुरू आहे. इन्फेक्शन नसले तरी मुलांना १०० ते १०३ डिग्री सेल्सीअस ताप येत आहे. उन्हात खेळल्यामुळे घाम येऊन अंगातील पाणी कमी होते. शक्यतो उन्हात खेळणे किंवा घराबाहेर पडणे टाळावे, मुलांनी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता आहे, असे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कडक उष्मा असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान वाढते, त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध यांच्याबरोबरच डायबिटीज, दमा, हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

रस्त्यांवर शुकशुकाट
गेल्या तीन-चार दिवसांपासून सूर्यनारायणाने रौद्र रुप धारण केल्याने जिल्ह्यासह परिसरात उष्णतेची लाट पसरली असून, यामध्ये रायगडकर होरपळून निघाले. सूर्याच्या चढलेल्या पार्याने कमालीचा उकाडा वाढला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते नागरिकांविना ओस पडलेले दिसत आहेत. सूर्याचा वाढता पारा पाहून नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंद केले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम शेतातील मशागतीच्या कामावरही झाला आहे. खरीप पेरणीपूर्वीची मशागतीची कामे शेतकरी पहाटे किंवा सायंकाळी करताना दिसत आहेत. या तापमानाचा परिणाम ट्रक वाहतुकीवरसुद्धा झाल्याचे स्पष्टपणे जाणवते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ट्रक चालक वाहन न चालविता रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावलीखाली आराम करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -