घररायगडRaigad Mhasala Water : मेंदडी पाझर तलावातील पाणी दूषित आहे का?

Raigad Mhasala Water : मेंदडी पाझर तलावातील पाणी दूषित आहे का?

Subscribe

म्हसळा पंचायत समितीने मेंदडी पाझर तलावातून पाण्याचे नमुने घेतले आहेत. गढूळ, दूषित पाण्यामुळे रोगराई टाळण्यासाठी पंचायत समितीने ही खबरदारी घेतली आहे.

म्हसळा : तालुक्यातील मेंदडी पाझर तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी अलिबागला पाठवण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याची पातळी घटली आहे. शिवाय येथील पाणी पिवळसर आणि गढूळ दिसत आहे. या पाण्यातून लोकांना कुठलाही आजार होऊ नये, यासाठी पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. यासाठी म्हसळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महादेव जाधव, ग्रामीण पाणी पुरवठयाचे उपअभियंता जगदिश फुलपगारे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी मेंदडी पाझर तलावाला अलीकडेच भेट दिली होती.

रायगड जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सर्व तालुक्यांत प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशातच म्हसळा तालुक्यातील मेंदडी पाझर तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी दूषित झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मेंदडी, मेदडी कोड, वारळ, कळसुरी, वतुरुंबाडी आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत मेंदडी पाझर तलाव आहे. या तलावांतील पाण्यावर ६ हजार लोक अवलंबून आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : तहानलेल्या पेण तालुक्याला ५ दिवसांआड पाणी

गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये मेंदडी पाझर तलावातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर पाण्यातील जलपर्णी वनस्पती आणि चिखलामुळे पाण्याला वास येत होता आणि पाण्याचा रंगही बदलला होता. तर २०१२ मध्ये वारळ, तुरूंबाडी या गावांतील अनेक लोकांना ग्रॅस्टोची लागण झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा… Pen Summer News : गरिबांच्या फ्रिजला ‘अच्छे दिन’

त्यामुळे सतर्क झालेल्या सरकारने दूषित पाणीपुरवठा होऊन लोकांना रोगराई झाल्यास संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, असे पत्र तालुक्यांतील ग्रामपंचायतीना स्थानिक प्रशासनाने दिले होते. तेव्हापासून मेंदडी पाझर तलावाचे नियमित नमुने घेतले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -