घररायगडसंगमनेर नगर परिषेदला खालापूर नगर पंचायत विकास पॅटर्नची भुरळ

संगमनेर नगर परिषेदला खालापूर नगर पंचायत विकास पॅटर्नची भुरळ

Subscribe

पाच वर्षांत विकास कामे आणि स्वच्छतेबाबत आघाडीवर असलेल्या येथील नगर पंचायतीला संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवक आणि अधिकारी यांनी भेट दिली. अभ्यास दौर्‍याच्या निमित्ताने नगरसेवक आणि अधिकारी येथे होते.

पाच वर्षांत विकास कामे आणि स्वच्छतेबाबत आघाडीवर असलेल्या येथील नगर पंचायतीला संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवक आणि अधिकारी यांनी भेट दिली. अभ्यास दौर्‍याच्या निमित्ताने नगरसेवक आणि अधिकारी येथे होते. नगर पंचायतीला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. नगर पंचायतीचे दैनंदिन कामकाज आणि विकास कामे यांची माहिती घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील ’ब’ वर्ग संगमनेर नगर परिषदेच्या नगरसेवक, आधिकार्‍यांंचा चार दिवसांचा अभ्यास दौरा पार पडला. पेयजल योजना, घरकूल योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, विद्युत पुरवठा, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीची अभ्यास दौर्‍यात माहिती घेण्यात आली. सामाजिक जबाबदारी अंतर्गत शहराच्या मध्यवर्ती ठिकाण उभ्या केलेल्या उद्यानाला देखील यावेळी भेट देण्यात आली.

नवनिर्मित खालापूर नगरपंचायतीत अवश्यक असणारा निधी उपलब्ध नसतानाही सीएसआर फंड आणि लोकसहभागातून नियोजनबद्ध काम झाले आहे.
– शैलेश कलंत्री, नगरसेवक, संगमनेर नगर परिषद

- Advertisement -

कोरोना संसर्गात संपूर्ण राज्यात सर्वप्रथम घरोघरी आरोग्य तपासणी कार्यक्रम नगर पंचायतीने राबवत केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांनी दिली. अभ्यास दौर्‍यासाठी संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक शैलेश कलंत्री, राजेंद्र वाघचौरे, नूर महम्मद शेख, इब्राहिम देशमुख, सभा लिपीक भीमाशंकर वरपे आणि इतर अधिकारी सहभागी होते. माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, कोषागार सुरेश पोसतांडेल यांनी नगर पंचायतीच्या विकास कामांची माहिती दिली.

ब वर्गाच्या संगमनेर नगर परिषदेच्या नगरसेवक, आधिकार्‍यांंनी अभ्यास दौरा करताना कौतुकाची थाप दिल्याने आणखी ऊर्जा मिळाली आहे. नगर पंचायतीसाठी ही अभिमानाची बाब आहे.
– सुरेखा भगणे शिंदे, मुख्याधिकारी, खालापूर नगर पंचायत

- Advertisement -

हेही वाचा –

टिटवाळा रोड एनआरसीमधील धोकादायक चिमणी जमीनदोस्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -