घररायगडतहसीलदार दळवी लाच घेताना रंगेहाथ अटक

तहसीलदार दळवी लाच घेताना रंगेहाथ अटक

Subscribe

नवी मुंबई लाचलुचपत विभागाची अलिबागमध्ये कारवाई

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

अलिबाग:
अलिबागच्या तहसिलदार मिनल दळवी यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तालुक्यातील गोंधळपाडा येथील दळवी यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की,अलिबाग तहसीलदार दळवी यांनी तक्रारदार यांच्याकडे सात बारा उताराचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. त्यासाठी दोन लाखांवर तडजोड करण्यात आली होती. त्यानुसार तक्रारदार यांना दोन लाखांची रुपये घेऊन गोंधळपाडा येथील निवासस्थानी बोलावले. मात्र याबाबतची तक्रार लाचलुचपत खात्याकडे करण्यात आल्याने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तससिलदार दळवी यांच्या घरी पोचले आणि त्यांनी दोन लाखाची लाच घेताना दळवी यांना रंगेहात पकडले. लगेचच त्याना अटक केल्याची माहिती देण्यात आली.
बॉक्स..
दळवींना उच्च रक्तदाबाचा त्रास
नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख,पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, लाच लुचपत विभागाने तहसीलदार दळवी यांना अटक करताच त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -