घररायगडसावित्री नदीतून काढल्या जाणार्‍या गाळाचे झाले डोंगर 

सावित्री नदीतून काढल्या जाणार्‍या गाळाचे झाले डोंगर 

Subscribe

महाड तालुका आणि शहराला ऐन पावसाळ्यात भेडसावणार्‍या पुराच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार सावित्री आणि इतर नद्यांमधील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार गाळ काढण्याच्या कामासाठी गेली दोन वर्ष करोडो रुपये खर्च केले जात आहेत. आतापर्यंत ७ लाख ५० हजार क्युबिक घनमीटर इतका गाळ काढला गेला आहे. शहरालगत असलेल्या सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांमधील गाळ काढण्याचे काम वेगात आहे. या गाळ काढण्याच्या कामामध्ये अनियमितता असल्याने आणि काढण्यात येणार्‍या गाळाच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने या गाळाचे करायचे काय असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

निलेश पवार: महाड
तालुका आणि शहराला ऐन पावसाळ्यात भेडसावणार्‍या पुराच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार सावित्री आणि इतर नद्यांमधील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार गाळ काढण्याच्या कामासाठी गेली दोन वर्ष करोडो रुपये खर्च केले जात आहेत. आतापर्यंत ७ लाख ५० हजार क्युबिक घनमीटर इतका गाळ काढला गेला आहे. शहरालगत असलेल्या सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांमधील गाळ काढण्याचे काम वेगात आहे. या गाळ काढण्याच्या कामामध्ये अनियमितता असल्याने आणि काढण्यात येणार्‍या गाळाच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने या गाळाचे करायचे काय असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
महाड शहराजवळ शेडाव नाका, गांधारी, आदी ठिकाणी गाळ काढला जात आहे. शेडाव नाका येथून संपूर्ण महाड शहराला सावित्री नदीने विळखा घातला आहे. नदी पात्र जवळपास अर्धा किमी अंतर रुंदीचे आहे. शेडाव नाका येथून केंबूर्ली पर्यंत जवळपास पाच किमी अंतराचे नदी पात्र आहे. यादरम्यान मातीचे तीन बेटे आहेत. हे बेटे देखील काढण्याचे काम सुरु केले आहे. जलसंपदा विभागाने हा गाळ काढण्यासाठी शासनाचे पोकलेन, डंपर, जे.सी.बी. अशी यंत्रणा वापरली आहे. शेडाव नाका येथून आतापर्यंत लाखो घनमीटर गाळ काढण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. हा गाळ शेजारी असलेल्या म्हाडाच्या मोकळ्या जागेत टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या गाळामध्ये दगड, वाळू, रेजगा याचा समावेश आहे. गाळाचा डोंगर याठिकाणी जमा झाला असून या डोंगराचे करायचे काय असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.त्याचप्रमाणे महाड शहरालगत असलेल्या जलसंपदा विभाग, महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय दुध डेअरी, एस,टी स्थानकाच्या मोकळ्या जागेत हा गाळ टाकला जात आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात जवळपास ७१ ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. या ठिकाणी काढण्यात येणार्‍या गळाबाबत देखील कांही शेतकर्‍यांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातच नुकताच महाड तहसील कार्यालयाने काढण्यात आलेल्या गाळाच्या लिलावाबाबत निविदा जाहीर केली होती मात्र या लिलावाला देखील प्रतिसाद मिळाला नसल्याने आता या गाळाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वर्षभरापासून गाळ काढण्याचे काम सुरु
महाड, पोलादपूर तालुक्यामध्ये जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरात शहराचे मोठे नुकसान झाले. शहरातील पाण्याची पातळी जवळपास वीस फूटापर्यंत गेली. यामुळे व्यापारी नागरिक आणि शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. महापुरानंतर महाडकर नागरिकांनी पूर नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले असून शासनाला ठोस उपाययोजना करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. ठोस उपाययोजना बाजूला ठेवून गाळ काढण्याच्या कमला गती देण्यात आली आहे. विविध स्तरावर झालेल्या बैठकानंतर महाड मधील सावित्री, काळ, आणि इतर छोट्या नद्यांमधील गाळ काढला जात असून गेले वर्षभरापासून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. याकरिता खाजगी ठेका देखील देण्यात आला आहे. तर कांही ठिकाणी शासकीय पातळीवर वाळू लीलाव जाहीर करून ड्रेझरच्या माध्यमातून गाळ काढला जात आहे.

- Advertisement -

काढण्यात येणार्‍या गाळाच्या बाबतीत नियोजन झालेले नाही. त्यामुळे ठेकेदार हा गाळ खाजगी जागेत टाकून विक्री करत आहेत. शिवाय प्रशासन याला पाठबळ देत असल्याने याबाबत चौकशी केली जावी.
– चेतन पोटफोडे,
पदाधिकारी, शिवसेना, महाड

महसूल विभाग ज्या जागा सुचवत आहेत त्याप्रमाणे हा गाळ टाकला जात आहे. गाळाचे काय करायचे हा महसूल विभागाचा प्रश्न आहे. गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर असून नदीचा प्रवाह सुरळीत होण्यास याचा नक्कीच फायदा होईल.
– देवेंद्र लोकरे,
सहाय्यक अभियंता, लघु पाटबंधारे खाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -