घररायगडमाथेरान वाढदिवसाच्या जल्लोषात अश्व शर्यतीचा थरार

माथेरान वाढदिवसाच्या जल्लोषात अश्व शर्यतीचा थरार

Subscribe

२१ मे १८५० रोजी माथेरान उदयास आले.ठाण्याचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर ह्युज मॅलेट हे चौक मार्गे वन ट्री हिल पॉइंटची नाळ चढून डोंगराच्या माथ्यावर आले.येथील थंड वातावरण अनुभवून शिकारी करत ते रामबाग पॉइंटच्या पायवाटेने चौककडे परतले.व काही दिवसांनी पुन्हा येऊन येथे पहिली झोपडी बांधली.येथील घनदाट जंगल पाहून या निसर्गावर मोहित झाल्यानंतर या टापुला काहीतरी नाव द्यावे.अखेर डोंगर माथ्यावर असलेले रान असा निसर्ग दिसला आणि हे माथ्यावरील रान झाले माथेरान.८०३.६६ मीटर उंचीवर असलेले माथेरान ब्रिटिशकाळापासून घनदाट जंगलाने वेढले आहे.आज १७३ वर्षांनंतर देखील पर्यावरण अबाधित राखत माथेरान उभे आहे. माथेरानच्या थंड वातावरणात वाढदिवशी पर्यटकांना अश्वशर्यतींचा थरार पहावयास मिळाला.

दिनेश सुतार, माथेरान

माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या वतीने ऑलिम्पिया रेसकोर्स म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल येथे पार पडल्या.माथेरान हे फक्त पर्यटनस्थळ नसून हॉर्स रायडिंग चे प्रमुख ठिकाण आहे.येथील ऑलिम्पिया रेसकोर्स येथे माथेरान मधील प्रमुख अश्वपालकांकडून रायडिंगचे धडे दिले जातात.अनेक अश्व प्रेमी येथे हॉर्स रायडिंग शिकतात.अशा नवोदित घोडा चालकांची या अश्व शर्यतींमध्ये परीक्षा असते.गॅलपिंग,ट्रॉटींग,म्युसिकल बॉल अँड बकेट,सॅडलिंग युअर हॉर्स,टग ऑफ व्हॉर,गॅलपिंग गोल्फ ऑन हॉर्सबॅक,म्युसिकल मग्स ऑन हॉर्स बँक,टॅट पेगिंग अशा स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धांमध्ये आदिवासी बांधवांसाठी धावण्याची शर्यत लहान मुलांसाठी सॅक रेस,मुले आणि मुली यांच्यासाठी फ्लॅट रेस येथे येणार्‍या पर्यटकांना सुद्धा यात भाग घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.पर्यटकांसाठी रिले रेस चे आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे माथेरानच्या थंड हवेत शर्यतीमध्ये सहभाग घेण्याची पर्वणी होती.त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांनी आणि मुंबई पुणे येथील घोडेस्वारांनी आपली कसब दाखविण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून अश्व शर्यतीमधून माथेरानचा वाढदिवस साजरा केला.
माथेरान युथ सोशल क्लब आणि नगरपालिकेच्या वतीने शर्यतींच्या माध्यमातून माथेरानचा वाढदिवस साजरा करण्यात पर्यटक ही सामील झाले.हा दिवस पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरला.पर्यटन,अश्व शर्यत आणि माथेरानचा वाढदिवस हा त्रिवेणी संगम पर्यटकांनी ऑलिंपिया रेसकोर्स वर अनुभवला.या शर्यतींमध्ये येथील घोडेस्वार संदीप शिंदे यांचा लाईफ टाइम आचिवमेंट या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

पर्यटनामध्ये शर्यतीचे वेगळेपण
गेली पन्नास वर्षाची परंपरा अबाधित राखत माथेरान युथ सोशल क्लबच्या वतीने तत्कालीन अध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांच्या संकल्पनेतून या अश्व शर्यतीचे आयोजन होत असते.प्रदीप दिवाडकर यांच्या नंतर या संस्थेचे विध्यमान अध्यक्ष प्रशाम दिवाडकर व त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने या शर्यतीचे आयोजन केले जाते.या शर्यतींमध्ये सहभाग घेण्यासाठी मुंबई,पुणे येथून शर्यतीचे चाहते येतात.यावेळी २१ मे ला रविवार असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.पर्यटनामध्ये शर्यतीचे वेगळेपण पाहून पर्यटक खुश झाले.

माथेरान मध्ये पर्यटनासाठी परिवारासोबत आलो.मुंबईच्या गर्मी पासून थंडाव्यात आल्यावर हॉटेलमध्ये समजले की माथेरानचा वाढदिवस येथील अश्वशर्यतींनी होणार आहे म्हणून आम्ही पहावयास गेलो.ब्रिटिशकालीन भव्य रेसकोर्स,सभोवती गर्द हिरवी झाडी आणि त्या रेसकोर्स मध्ये पळणारी अश्व.असे चित्र आम्ही कुठेही पाहिले नसल्याने एक वेगळ्या ठिकाणी आल्याचा भास होत होता.लहान मुले, महिला,आदिवासी बांधव यांच्यासह जॉकीचा पोशाख परिधान केलेले अश्वचालक आमच्यासाठी हे सर्व विलक्षण होत.माथेरानचा वाढदिवस अश्वशर्यतींनी साजरा केला.हे प्रत्येकवर्षी व्हायला पाहिजे.त्यामुळे २१ मे ला आम्ही आवर्जून माथेरानला येणार.
– सुमित शिरसाट, पर्यटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -