घररायगडआदिवासी बांधवांना जॉबकार्ड देण्यासाठी जिल्हा परिषद राबविणार विशेष मोहीम

आदिवासी बांधवांना जॉबकार्ड देण्यासाठी जिल्हा परिषद राबविणार विशेष मोहीम

Subscribe

२८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान आदिवासी बांधवांना जॉब कार्ड काढून देणे, जॉबकार्ड आद्यवतीकरण करण्यासाठी तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालय किंवा तालुक्यातील सोयीच्या ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

 

अलिबाग: रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून, तसेच स्थलांतर रोखण्यासाठी व मोठ्या प्रमाणात आदिवासी मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत नवीन जॉब कार्ड देणे, जॉब कार्डचे अद्यवतीकरण करणे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत तालुकास्तरावर २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.

आदिवासी समाजाचा आर्थिक सामाजिक विकास करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र तरीही आदिवासी बांधव सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रायगड जिल्हा परिषदेने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. २८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान आदिवासी बांधवांना जॉब कार्ड काढून देणे, जॉबकार्ड आद्यवतीकरण करण्यासाठी तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालय किंवा तालुक्यातील सोयीच्या ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
 डाटा एन्ट्री ऑपरेटर, विस्तार अधिकारी उपस्थित राहणार
२८ नोव्हेंबर रोजी अलिबाग, कर्जत, माणगांव, मुरुड, पनवेल, रोहा, श्रीवर्धन तालुक्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, २९ नोव्हेंबर रोजी खालापूर, म्हसळा, पेण, पोलादपूर, तळा, उरण येथे तर ३० नोव्हेंबर रोजी महाड, सधागड तालुक्यात शिबिर पार पडेल. या शिबिरांमध्ये सर्वहरा जन आंदोलनाचे पदाधिकारी, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, विस्तार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच शिबिराच्या पूर्वतयारी करिता तालुकास्तरावर आढावा सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती, रोजगार हमी योजना सहाय्यक गट विकास अधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -