टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, नवीन ड्रेसमध्ये समोर आला भारतीय खेळाडूंचा फोटो

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला उद्या (मंगळवार) सुरूवात होणार आहे. टी-२० मालिकेचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. २०२३ मधील ही पहिलीच मालिका टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र, मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत टीम इंडिया एका नव्या टायटल स्पॉन्सरसोबत मैदानात उतरणार आहे. ज्या संदर्भातील फोटोही समोर आले आहेत.

टीम इंडियाच्या जर्सीचा टायटल स्पॉन्सर आता MPLऐवजी किलर ब्रँड बनला आहे. टीम इंडिया आता किलर ब्रँडच्या लोगोची जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे. यावेळी फिरकीपटू युझवेंद्र चहलने टीम इंडियाच्या नवीन जर्सीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये किलर ब्रँडचा लोगो स्पष्ट दिसत आहे. या फोटोत युझवेंद्र चहल व्यतिरिक्त उमरान मलिक, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार तसेच ऋतुराज गायकवाड दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

यापूर्वी टीम इंडियाच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोशिवाय MPL स्पोर्ट्सचे नाव दिसत होते. मात्र, आता तिथे किलर हे नाव लिहिलेले दिसणार आहे.

टी-२०साठी असा असेल भारतीय संघ –

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.


हेही वाचा :स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोला लागली लॉटरी