घरक्रीडाकोलकाताच्या संघाला मोठा धक्का; अजिंक्य राहाणे दुखापतीमुळे आयपीएल बाहेर

कोलकाताच्या संघाला मोठा धक्का; अजिंक्य राहाणे दुखापतीमुळे आयपीएल बाहेर

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचा शेवट जवळ आला आहे. आजपासून आयपीएलच्या अखेरच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. या आठवड्यातील सर्व समाने हे प्ले ऑफमध्ये प्रवेशासाठी खेळले जात आहेत. यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये गुजरात टायटन्सने अव्वल स्थान पटकावले आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचा शेवट जवळ आला आहे. आजपासून आयपीएलच्या अखेरच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. या आठवड्यातील सर्व समाने हे प्ले ऑफमध्ये प्रवेशासाठी खेळले जात आहेत. यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये गुजरात टायटन्सने अव्वल स्थान पटकावले आहे. तसंच, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघांची चुरस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आता कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला अजिंक्य राहणेच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. अजिंक्य राहणे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. अजिंक्यने बायोबबल सोडून आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे कोलकाताची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अजिंक्य रहाणेने दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 14 मे रोजी हैदराबादविरोधातील सामन्यात फलंदाजीदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही त्याने फलंदाजी केली होती. त्याने या सामन्यात २४ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या होत्या. आता मात्र त्याच्या पायाला त्रास जाणवत असल्यामुळे त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित सामन्यात तो खेळणार नसून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

अजिंक्य रहाणे बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये चार आठवडे राहणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे 1 जुलै ते 17 जुलै या काळात भारत आणि इंग्लड यांच्यात होणाऱ्या सामन्यांतही तो सामील होण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, दोन वेळा जेतेपद पटकावलेला अजिंक्य रहाणेचा केकेआर संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. केकेआरची येत्या 18 मे रोजी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सशी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी येथे लढत होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लार्सन टूर्बोने पटकावले ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन टी – २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -