घरक्रीडाऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून भारतावर विजय, तर रोहित शर्माची 'या' विक्रमाशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून भारतावर विजय, तर रोहित शर्माची ‘या’ विक्रमाशी बरोबरी

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व सलामीवीर अॅरॉन फिंचने सामन्याच्या सुरूवातीलाच फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संघाला 209 धावांचे आव्हान पार करणे सहज शक्य झाले. (Australia chase down 209 to beat India by four wickets)

ऑस्ट्रेलियानेही सुरुवातीपासून कमाल फलंदाजी केली. कॅमरुन ग्रीनचं धडाकेबाज अर्धशतक आणि वेड-स्मिथच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 4 विकेट्सनी सामना जिंकला. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 0-1 ने आघाडीवर आहे.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना पुरेशी फलंदाजी करता आली नाही. सामन्याच्या 5 व्या षटकात 35 धावांपर्यंत दोघेही पॅव्हेलियनमध्ये बसले होते. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या के.एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरला. राहुलने अवघ्या 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने सूर्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली.

12व्या षटकात राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. संघाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आपले अर्धशतक 25 चेंडूत पूर्ण केले. त्यानंतर 20 व्या षटकातील अखेरच्या 3 चेंडूत षटकारांची हॅट्ट्रिक करत भारताला 200च्या पुढे नेले.

- Advertisement -

कर्णधार रोहित शर्माचा विक्रम

भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी, कर्णधार रोहित शर्मा याने एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. रोहित शर्मा मार्टिन गप्टिलसारखाच T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. मार्टिन गप्टिलच्या नावावर T20I क्रिकेटमध्ये 172 षटकार आहेत. आता रोहितच्या नावावरही 172 षटकार झाले आहेत.


हेही वाचा – शौचालयात ठेवलेले अन्न खाताना खेळाडूंचा व्हिडीओ व्हायरल, संबंधित अधिकारी निलंबित

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -