घरक्रीडाIPL 2021 : आणखी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूची यंदाच्या मोसमातून माघार

IPL 2021 : आणखी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूची यंदाच्या मोसमातून माघार

Subscribe

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) यंदाच्या मोसमाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यंदा आयपीएल स्पर्धा ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत खेळली जाणार आहे. मात्र, ही स्पर्धा सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला धक्का बसला आहे. सीएसकेचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूडने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी अ‍ॅशेस आणि टी-२० वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे फिट राहता यावे म्हणून हेझलवूडने आगामी आयपीएल मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याची जागा घेण्यासाठी सीएसके इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडचा संघात समावेश करण्याची शक्यता आहे.

माघार घेणारा तिसरा ऑस्ट्रेलियन 

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेणारा हेझलवूड हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. याआधी जॉश फिलिपे (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि मिचेल मार्श (सनरायजर्स हैदराबाद) यांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. ‘मागील १० महिने खूप अवघड होते. वेगवेगळ्या ठिकाणी बायो-बबलमध्ये राहणे आणि क्वारंटाईनमध्ये असणे याने थकवा जाणवू लागला आहे. त्यामुळे मी क्रिकेटपासून दूर राहण्याचा आणि घरी आराम करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे हेझलवूड म्हणाला.

- Advertisement -

मागील मोसमात केवळ एक विकेट

आयपीएल स्पर्धेचा मागील मोसम युएईमध्ये झाला होता. ३० वर्षीय हेझलवूडने या स्पर्धेत केवळ तीन सामने खेळले होते आणि त्याला एक विकेट घेता आली होती. आता हेझलवूडच्या अनुपस्थितीत सीएसकेकडे ड्वेन ब्राव्हो, सॅम करन आणि लुंगी इंगिडी या परदेशी वेगवान गोलंदाजांचा पर्याय आहे. हेझलवूडने माघार घेतल्यामुळे आता सीएसके इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडला संघात घेऊ शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -