घरक्रीडाधोनीच्या शर्टवरील सहीनंतर सुनील गावस्कर भावूक; म्हणाले, 'मरणाआधी...'

धोनीच्या शर्टवरील सहीनंतर सुनील गावस्कर भावूक; म्हणाले, ‘मरणाआधी…’

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चिदंबरम स्टेडियमवरील झालेला सामना शेवटचा सामना ठरला. या सामन्यानंतर चेन्नईच्या संघाचे चाहते धोनीसाठी थांबले होते. यावेळी धोनीने मैदानाच गोल राऊंड मारत सर्व चाहत्यांना धन्यवाद केलं. त्याचवेळी टी-शर्ट आणि टेनिस बॉल चाहत्यांकडे फेकत त्यांचे आभार मानले.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चिदंबरम स्टेडियमवरील झालेला सामना शेवटचा सामना ठरला. या सामन्यानंतर चेन्नईच्या संघाचे चाहते धोनीसाठी थांबले होते. यावेळी धोनीने मैदानाच गोल राऊंड मारत सर्व चाहत्यांना धन्यवाद केलं. त्याचवेळी टी-शर्ट आणि टेनिस बॉल चाहत्यांकडे फेकत त्यांचे आभार मानले. या सगळ्यात भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्करही मागे राहिले नव्हते. त्यांनी आपल्या शर्टवर धोनीची सही घेतली. त्यामुळे ही आयपीएल धोनीची अखेरची होती का? अशा चर्चा रंगल्या. मात्र सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी धोनीच्या सहीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

स्टार स्पोर्ट्सवरील सामन्यानंतरच्या कार्यक्रमात सुनील गावस्कर हे चेन्नई सुपर किंग्सचे कुठे चुकले? याचे विश्लेषण करत होते. त्यावेळी त्यांनाही प्रेक्षकांप्रमाणे धोनीचा ऑटोग्राफ घेण्याचा मोह आवरता आला नाही. अँकरिंग करत असताना सुनील गावस्कर यांनी थेट मैदानात धाव घेत धोनीची शर्टवर सही घेतली. त्यानंतर दोघांनी मिठी मारली. त्यावेळी धोनीने शर्टवर दिलेली सही आणि ती मिठी गावस्कर यांच्यासाठी खास आठवण असून ती आयुष्यभर लक्षात राहणारी आहे.

- Advertisement -

याबाबत एका कार्यक्रमात बोलताना सुनील गावस्कर भावूक झाले. शर्टावर ऑटोग्राफ मिळाल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. दुसऱ्या दिवशी गावस्करांनी तो शर्ट लाईव्ह टीव्हीवर दाखवला. गावस्कर यांनी धोनीबद्दलच्या प्रेमाचा आणि आदराचा पुनरुच्चार केला. (Before I die if I get 2 minutes I would revisit two great moments Sunil Gavaskar Gets Teary-Eyed While Displaying MS Dhoni Signed Shirt)

धोनीच्या सहीबाबत सुनील गावस्कर काय म्हणाले?

- Advertisement -

“मी माहीकडे गेलो आणि त्याला मी घातलेल्या शर्टवर ऑटोग्राफवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. त्याला हे मान्य केल्याने खूप आनंद झाला. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता कारण या व्यक्तीने भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. मला माहित आहे, माझ्या आयुष्यातील शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. त्यामुळे मला मरण्यापूर्वी, जर मला 2 मिनिटे मिळाली, तर मी दोन महान क्षणांना पुन्हा भेट देईन. कपिल देवने १९८३ विश्वचषक ट्रॉफी उचलताना आणि एमएस धोनीने २०११ च्या विश्वचषकात विजयी षटकार ठोकल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने बॅट मनगटाने फिरवली, हे दोन क्षण पाहिले तर मी शांतपणे मरेन”, ” असे सुनील गावस्कर म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताने 6 विकेट्सने चेन्नईवर विजय मिळवला. कोलकाताने 145 धावांचे आव्हान 4 विकेट्स गमावून 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केले. कोलकाताने या विजयासह प्लेऑफच्या जर तरच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची प्रतिक्षा आणखी वाढली आहे.


हेही वाचा – IPL 2023 : मुंबईच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अर्जुन तेंडुलकरच्या हाताला चावला कुत्रा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -