Commonwealth championship : प्रसुतीनंतर ९२ किलो वजन झाले, पण इंटरनॅशनल कमबॅकची जिद्द सोडली नाही

देशाला पहिले राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देणारी आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली महिला कुस्तीपटू गीता फोगट चार वर्षांनंतर आणि आई झाल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहे

geeta-phogat-fitness

देशाला पहिले राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देणारी आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली महिला कुस्तीपटू गीता फोगट चार वर्षांनंतर आणि आई झाल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहे. दंगल गर्ल म्हणून ओळख असलेली गीता दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियात ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ५९ किलो वजनी गटात राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार आहे. राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर राष्ट्रीय कुस्ती संघाने गीताची निवड या चॅम्पियनशीपसाठी केली आहे. गीताने राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये २ वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. तर राष्ट्रकुल चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक विजेते पैलवान खेळणार आहेत.

गीताने सांगितले ती कुस्तीपासून जरूर दूर गेली होती. पण तिच्या मनात सतत पुनरागमनाचा विचार येत राहतो. काही महिन्यांपूर्वी तिचे वजन ९२ किलो एवढे झाले होते. याच्यानंतर गीता पुनरागमनाबाबत विचारही करू शकत नव्हती पण पती पवन कुमारने तिला प्रोत्साहन दिले आणि तिने वजन कमी करायला सुरूवात केली. तर आता राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेपूर्वी तिने ५९ किलो वजन केले आहे. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा परतण्यासाठी गीताला ५७ किलो वजन करायचे आहे. गीता सिंधू बॉर्डरजवळील आखाड्यात तयारी करत आहे. सरावादरम्यान ती पुरूष पैलवानांसोबत सराव करत आहे कारण तिचे एकमेव ध्येय क्षमता वाढवणे आहे. गीताच्या म्हणण्यानुसार तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांची नितांत गरज आहे. त्यात चांगली कामगिरी केल्यानंतरच तिचे मनोबल वाढेल.

गीताने शेवटच्या वेळी २०१७ मध्ये तुर्कीमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. गीताने दोन वेळा राष्ट्रकुल चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहेत. ३२ वर्षीय गीता म्हणते की ती पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तिचे अंतिम लक्ष्य २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठीची पात्रता फेरी गाठण्याची आहे.


हे ही वाचा: IND VS NZ : जुन्या आठवणींना विसरून नवी सुरूवात करणार भारतीय संघ; अशी असू शकते दोन्ही संघातील प्लेइंग XI