घरIPL 2020CSK vs KXIP : चेन्नईचा किंग्ज इलेव्हनवर १० विकेट्स राखून दणदणीत विजय!

CSK vs KXIP : चेन्नईचा किंग्ज इलेव्हनवर १० विकेट्स राखून दणदणीत विजय!

Subscribe

पहिला सामना जिंकल्यानंतर IPL 2020 मध्ये पुढचे सलग ३ सामने हरणाऱ्या चेन्नईने (CSK) आज जबरदस्त कमबॅक करत किंग्ज इलेव्हन पंजाबचा (KXIP) तब्बल १० विकेट्स राखून दणदणीत पराभव केला. विजयासाठी पंजाबनं १७८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, ते पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या सलामीवीरांना बाद करण्यात पंजाबच्या एकाही गोलंदाजाला यश आलं नाही. शेन वॉट्सन (८३) आणि फॅफ डू प्लेसिस (८७) या दोघांनी पंजाबनं ठेवलेल आव्हान अगदी लीलया पार केलं. गुणतालिकेत सर्वात शेवटी अर्थात सातव्या आणि आठव्या स्थानावर असणाऱ्या या दोन्ही टीममधला सामना आज क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरला. विशेषत: पहिल्या डावात पंजाबचा कर्णधार के. एल. राहुली ६३ धावांची खेळी आणि दुसऱ्या डावात शेन वॉट्सन-फॅफ डू प्लेसिस या दोघांनी केलेली तब्बल १८१ धावांची नाबाद भागीदारीमुळे क्रिकेट चाहत्यांचा रविवार हा खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरला!

किंग इलेव्हन पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पंजाबची सुरुवात देखील दणदणीत झाली. राहुल (६३) आणि मयांक अगरवाल (२६) या दोघांनी पंजाबला ६१ धावांची सलामी दिली. अगरवाल आऊट झाल्यानंतर आलेल्या मनदीप सिंगने देखील २७ धावांची मोलाची भर घातली. निकोलस पूरणने देखील अवघ्या १७ बॉलमध्ये ३३ रन्स तडकावून टीमचा स्कोअर १७व्या ओव्हरमध्येच १५२ पर्यंत नेऊन ठेवला. मात्र, त्यानंतर पुढच्या ३ ओव्हरमध्ये पंजाबला फक्त २८ रन्सची भर घालता आली.

- Advertisement -

विजयासाठी १७९ रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या दोघा सलामीवीरांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. आत्तापर्यंत झालेल्या ४ सामन्यांमध्ये चेन्नईची सलामीची जोडी टीमला अपेक्षित सुरुवात मिळवून देण्यात सातत्याने अपयशी ठरली होती. आज मात्र शेन वॉट्सन आणि फॅफ डू प्लेसिस या दोघांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा संघाला करून देत शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला मोठा विजय मिळवून दिला. १७.४ ओव्हर्समध्ये या दोघांनी १८१ धावा तडकावून चेन्नईला गुणतालिकेत नेट रन रेटच्या शर्यतीत मोठा हातभार लावून दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -