घरक्रीडाकमिन्स आऊट, पॉल इन!

कमिन्स आऊट, पॉल इन!

Subscribe

दुसर्‍या कसोटीसाठी विंडीजचा संघ जाहीर

भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू किमो पॉलची वेस्ट इंडिजच्या संघात निवड झाली आहे. शुक्रवारपासून जमैका येथे सुरु होणार्‍या या सामन्यासाठी विंडीजने बुधवारी १३ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात वेगवान गोलंदाज मिग्वाएल कमिन्सला स्थान मिळाले नाही.

पॉलची पहिल्या कसोटी सामन्यासाठीही निवड झाली होती, पण पायाच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. मात्र, तो आता फिट झाला असून दुसर्‍या सामन्यात खेळू शकेल. त्याचप्रमाणे एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या यष्टीरक्षक जहमार हॅमिल्टनची या संघात निवड झाली आहे.

- Advertisement -

अँटिग्वा येथे झालेला पहिला कसोटी सामना भारताने ३१८ धावांनी जिंकत २ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात कमिन्सला एकही विकेट मिळवता आली नाही. दुसर्‍या डावात त्याने केवळ ७ षटके टाकली. त्यामुळे त्याला वगळण्यात संघातून आले.

दुसर्‍या कसोटीसाठी विंडीज संघ –

- Advertisement -

जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शाई होप (यष्टीरक्षक), डॅरेन ब्राव्हो, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जहमार हॅमिल्टन (यष्टीरक्षक), रहकीम कॉर्नवेल, शॅनन गॅब्रियल, किमार रोच, किमो पॉल, शमार ब्रूक्स.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -