घरक्रीडाDC vs MI Match IPL : जर आमचा पराभव झाला तर.., सामना...

DC vs MI Match IPL : जर आमचा पराभव झाला तर.., सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचं मोठं विधान

Subscribe

आयपीएल २०२२ (IPL 2022) चा १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC Vs MI) यांच्यामध्ये होणार आहे. मुंबईविरुद्ध विजयाची नोंद करून दिल्ली प्लेऑफमध्ये (Play Off) पोहोचेल. मात्र, हा सामना गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे मालक पार्थ जिंदाल (Parth Jindal) यांनी संघाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कुणीतरी आमच्यावर उपकार करावे, ते आम्हाला कधीच आवडले नाही. समीकरण सोपे आहे. शनिवारी जिंकलो तर आयपीएलमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल, जर आमचा पराभव झाला तर आम्ही बाहेर असू आणि प्लेऑफमध्ये जाण्यास पात्र ठरणार नाही. आमचा आमच्या मुलांवर संपूर्ण विश्वास आहे. चला हे करून दाखवूया, असं पार्थ जिंदाल यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात आरसीबीचे क्रिकेट चाहतेही मुंबई इंडियन्स संघाचं चीअर करताना दिसणार आहेत. कारण दिल्लीच्या पराभवात आरसीबीचा विजय दडलेला आहे. मुंबईने दिल्लीचा पराभव केला तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल.

- Advertisement -

मुंबई इंडियन्स घेणार बदला

या हंगामात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. तसेच तो सामना दिल्लीने ४ विकेट्सने जिंकला होता. अशा स्थितीत आता हा सामना जिंकून मागील पराभवाचा बदला घेण्याचे मुंबई इंडियन्सचे लक्ष असेल. तसेच मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात केल्यास मुंबई शेवटच्या स्थानावर खंबीरपणे उभी राहू शकते.

हेही वाचा : IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला IPLमध्ये पदार्पण करण्याची संधी, मुंबई इंडियन्सकडून फोटो शेअर

अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याची शक्यता

या सामन्यात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स पदार्पणाची संधी देऊ शकते. या हंगामा व्यतिरिक्त अर्जुनने गेल्या हंगामात सुद्धा अनेक वेळ घालवला आहे. मागील सामन्यामध्ये अर्जुनला घेणार असल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले होते. परंतु त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. आतापर्यंत २२ खेळाडू मुंबई इंडियन्सकडून १३ सामने खेळले आहेत.


हेही वाचा : Viral tweet : अभिनंदन नीता भाभी..,विजय मल्ल्याचं ते ट्विट तुफान व्हायरल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -