कार्तिक आर्यनच्या ‘Bhool Bhulaiyaa 2’ पुढे कंगनाचा ‘Dhaakad’ ठरला फ्लॉप: जाणून घ्या कमाईचे आकडे

कंगनाच्या या 'धाकड' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' शी टक्कर झाली सुरु आहे.

kangana ranaut starrer dhaakad tuf fight kartik aryan bhool bhulaiyaa on 2 box office film earn less than 2 crore on day
कार्तिक आर्यनच्या 'Bhool Bhulaiyaa 2' पुढे कंगनाचा 'Dhaakad' ठरला फ्लॉप: जाणून घ्या कमाई

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘धाकड’ (Dhaakad) हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात कंगना एजंट अग्नीची भूमिका साकारत आहे, जी देशाविरुद्ध दृष्ट लोकांशी लढताना दिसतेय, या चित्रपटात अर्जुन रामपालने (Arjun Rampal) खलनायकाची तर दिव्या दत्ताने नकारात्मक भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे कंगनाचे या चित्रपटात अनेक अॅक्शन केलेत. चित्रपटातील कंगनाचे जबरदस्त अ‍ॅक्शन सीन प्रेक्षकांनाही खूप आवडलेत. परंतु चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करू शकले नाही. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट आला आहे. यात चित्रपट अपेक्षित कमाई करू शकले नाही. कंगनानेही अशा प्रतिसादाची अपेक्षा केली नसेल.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 1.20 कोटींची कमाई केली आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी झेप अपेक्षित आहे. कंगनाच्या या ‘धाकड’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ शी टक्कर झाली सुरु आहे. दोन्ही स्टार्स या टक्करला सकारात्मकतेने घेत आहेत. हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) हा एक कॉमेडी हॉरर आहे, तर धाकड हा एक अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट आहे. तथापि, पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार, भूल भुलैया 2 ने बॉक्स ऑफिसवर ही टक्कर जिंकली आहे.

या चित्रपटाचे आणि कार्तिक या दोघांचेही कौतुक करताना दिसतेय. भुल भुलैया 2 ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचे झेंडे गाडले आहेत. ओपनिंग दिवशीच चित्रपटाने विक्रमी कमाई केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श याने ट्विट करत माहिती दिली की, कार्तिकच्या भुल भुलैया 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 14.11 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. दरम्यान हा हॉरर कॉमेडी सिनेमा डबल डिजिट कमाई करेल असा अंदाज ट्रेड अॅनालिस्टने वर्तवला होता. त्यामुळे हा अंदाज आता खरा ठरतोय. भुल भुलैया 3 हा चित्रपट देशातील 3200 हून अधिक स्क्रिनवर रिलीज झाला आहे. (bhool bhulaiyaa 2 movie)

अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ (bhool bhulaiyaa 2 movie song)  हा ‘भूल भुलैया’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भूल भुलैयामध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते.


हेही वाचा : Siddharth Shukla चं शेवटचं Song रिलीज, अभिनेत्याला पाहून चाहते भावूक