घरक्रीडास्वीडन आणि इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल

स्वीडन आणि इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Subscribe

बाद फेरीचे सर्व सामने आता संपले असून ६ जुलैपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होणार आहेत. ६ जुलैला उरूग्वेविरूद्ध फ्रान्स आणि ब्राझीलविरूद्ध बेल्जियम हे सामने रंगणार आहेत.

बाद फेरीचे सामने संपले असून बाद फेरीतील १६ संघांपैकी ८ संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. काल झालेल्या शेवटच्या बाद फेरीच्या सामन्यांतून स्वीडन आणि इंग्लंड या दोन संघांनी उपांत्यपूर्व फेरीत झेप घेतली आहे. विशेष म्हणजे स्वीडन तब्बल २४ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला असल्याने सर्व स्वीडन वासियात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने अटीतटीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटद्वारे कोलंबियावर विजय मिळवला आहे.

स्वीडन vs स्वित्झर्लंड

स्वीडन आणि स्वित्झर्लंड या दोन्ही संघांना बऱ्याच वर्षानंतर उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची संधी आली होती. त्यामुळे दोन्ही संघांनी सामना जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात स्वीडनने स्वित्झर्लंडवर १-० ने मात केली. सामन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही संघांचा सामन्यावर सारखाच प्रभाव दिसून येत होता. दोन्ही संघांकडून काही आक्रमणे करण्यात आली. मात्र कोणालाही यश येत नव्हते. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांचा एकही गोल झाला नाही. त्यामुळे मॅचच्या हाफ टाईमपर्यंत ०-० असाच स्कोर होता. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडनला अखेर यश आले. ६६ व्या मिनिटाला स्वीडनच्या एमिल फोर्सबर्गने गोल करत संघांला १-० ची आघाडी मिळवून दिली. एमिलचा हा गोल सामन्यात निर्णायक ठरला आणि स्वीडनने सामन्यात स्वित्झर्लंडवर १-० ने मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

- Advertisement -
emil
स्वीडनच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला एमिल फोर्सबर्ग

इंग्लंड vs कोलंबिया

इंग्लंड आणि कोलंबिया या दोन्ही संघाकडून बाद फेरीत अप्रतिम खेळ दाखवला गेला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर पेनल्टी शूटआऊटद्वारे इंग्लंडने कोलंबियावर विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये इंग्लंडकडून आक्रमक खेळ दाखवला गेला मात्र त्यांना त्यात यश आले नाही. दोन्ही संघांना पहिल्या सत्रात एकही गोल करता आला नाही. त्यामुळे मॅचच्या हाफ टाईमपर्यंत ०-० असाच स्कोर स्कोरबोर्डवर होता. दुसऱ्या हाफमध्ये ५७ व्या मिनिटाला कोलंबिया संघांच्या चूकीमुळे इंग्लंडला पेनल्टी मिळाली. पेनल्टीचा पूर्ण उपयोग करत इंग्लंड संघांचा कर्णधार हॅरी केनने सामन्यातील पहिला गोल नोंदविला. त्यानंतर सामन्याची ९० मिनिटा पूर्ण होईपर्यंत इंग्लंडने १-० अशी आघाडी ठेवली. अतिरिक्त देण्यात आलेल्या वेळेत ९३ व्या मिनिटाला कोलंबियाच्या येरी मिनाने गोल केला आणि संघांला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे दोन्ही संघांनाही सामना जिंकण्यासाठी पेनल्टी शूटआऊट खेळण्याची संधी देण्यात आली. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने कोलंबियावर ४-३ ने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत झेप घेतली.

eng team
सामन्यात विजयानंतर जल्लोष करताना इंग्लंडचा संघ

बाद फेरीचे सर्व सामने आता संपले असून ६ जुलैपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होणार आहेत. ६ जुलैला उरूग्वेविरूद्ध फ्रान्स आणि ब्राझीलविरूद्ध बेल्जियम हे सामने रंगणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -