घरक्रीडा'बीसीसीआयमध्ये भाजपाची मानसिकता'; पाकिस्तानचे माजी अध्यक्ष रमीझ राजांचा दावा

‘बीसीसीआयमध्ये भाजपाची मानसिकता’; पाकिस्तानचे माजी अध्यक्ष रमीझ राजांचा दावा

Subscribe

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर रमीझ राजा हे काहीना काही बरळत आहेत.

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर रमीझ राजा हे काहीना काही बरळत आहेत. अशातच रमीझ राजा यांनी बीसीसीआयमध्ये भाजपाच्या मानसिकतेचा प्रभाव असल्याने पाकिस्तान क्रिकेटला त्याचा फटका बसत असल्याचा दावा केला आहे. (Former Pakistan Cricket Board Chairman Ramiz Raja BCCI Indian cricket board BJP)

गव्हर्नमेंट कॉलेज युनिव्हर्सिटी लाहोरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान रमीझ राजा यांनी याबाबत भाष्य केले. ”भारतात भाजपाच्या मानसिकतेचा प्रभाव आहे. पाकिस्तान ज्युनियर लीग किंवा पाकिस्तान महिला लीग मी आणली. या स्पर्धांमधून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आर्थिक फायदा झाला असता आणि त्यातून पाकिस्तान क्रिकेटसाठी निधी उभा राहिला असता. त्यामुळे आयसीसीकडून येणाऱ्या निधीवर अवलंबून राहायला लागले नसते. सध्या त्याच निधीवर पाकिस्तान क्रिकेट सुरू आहे. भारताकडे अनेक उप्तन्नाचे स्त्रोत आहेत. ते आयसीसीला सर्वाधिक महसूल देत आहेत. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचाही मोठा वाटा आहे. पाकिस्तानही हळुहळू पाऊल पुढे टाकत आहे. पण, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या लीडरशीपमध्ये सक्रीय सहभाग घ्यायला हवा”, असा दावा रमीझ राजा यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, आगामी आशिया चषक 2023वरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. नुकताच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आगामी आशिया चषक 2023मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याची माहिती दिली. जय शाह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर आता याच ट्वीटवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख नजम सेठी यांनी जय शाह यांच्यावर टीका केली. ‘आशिया कप २०२३ संदर्भात जे काही निर्णय घेतले जात आहेत ते एकतर्फी आहे’, असा आरोप नजम सेठी यांनी केला. तसेच, ‘पाकिस्तान बोर्डाकडून किंवा इतरांकडून कोणताही सल्ला घेतला जात नाही’ असेही त्यांनी सांगितले होते.


हेही वाचा – आशिया चषक 2023 : जय शाहांच्या ट्वीटला पीसीबीचे प्रमुख नजम सेठींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -