घरक्रीडाFrench Open 2020 : राफेल नदाल, ग्रिगोर दिमित्रोव्हची आगेकूच 

French Open 2020 : राफेल नदाल, ग्रिगोर दिमित्रोव्हची आगेकूच 

Subscribe

नदालला यंदाही फ्रेंच ओपन जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. 

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल, तसेच बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यात यश आले. दुसऱ्या सीडेड नदालने अमेरिकेच्या मॅकेंझी मॅकडोनाल्डचा ६-१, ६-०, ६-३ असा धुव्वा उडवला. नदाल हा ‘क्ले कोर्ट’चा बादशाह म्हणून ओळखला जातो आणि त्याने या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेरीत उत्कृष्ट खेळ केला आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मॅकडोनाल्डने नदालला झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण यात त्याला फारसे यश आले नाही. त्याला पहिल्या दोन सेटमध्ये केवळ १ गेम जिंकला आला.

झ्वेरेवही तिसऱ्या फेरीत 

दुसरीकडे ग्रिगोर दिमित्रोव्हने स्लोव्हाकियाच्या आंद्रेय मार्टिनचा ६-४, ७-६, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात दिमित्रोव्हने मार्टिनची सर्विस पाच वेळा मोडली. तसेच सहाव्या सीडेड जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवलाही तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यात यश आले. त्याने चुरशीच्या झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात फ्रांसच्या पिरे-हुग्युस हर्बर्टवर २-६, ६-४, ७-६, ४-६, ६-४ अशी मात केली.

- Advertisement -

प्लिस्कोवाला पराभवाचा धक्का 

चेक प्रजासत्ताकच्या दुसऱ्या सीडेड कॅरोलिना प्लिस्कोवाला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला जेलेना ओस्तापेंकोने ४-६, २-६ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. २३ वर्षीय ओस्तापेंकोने याआधी २०१७ मध्ये फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते. परंतु, यंदा तिला सीडींग मिळालेले नाही. मात्र, तिने या सामन्यात उत्कृष्ट खेळ करत पहिल्याच सेटमध्ये प्लिस्कोवाची सर्विस तब्बल तीन वेळा मोडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -