घरताज्या घडामोडीVIDEO : 'तुझी निवड झाली' ऐकताच; तरुणीने भररस्त्यात धरला ठेका

VIDEO : ‘तुझी निवड झाली’ ऐकताच; तरुणीने भररस्त्यात धरला ठेका

Subscribe

'तुझी निवड झाली' आहे, हे शब्द कानावर पडताच तरुणीचा आनंद गगनात मावेनासा होतो.

सोशल मीडिया अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यातच सध्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये या तरुणीला ‘तुझी निवड झाली आहे’, असे सांगतात ही तरुणी भररस्त्यात नाचायला लागते.

तुमच्या चेहऱ्यावरही उभं राहिल स्मित हास्य

सर्वांच्याच आयुष्यात नोकरी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. तुझी निवड झाली, असे समोरच्या व्यक्तीने शब्द उच्चारताच तो आनंद गगनात मावेनासा होतो, असाच काहीसा आनंद एका तरुणीला झाला आहे. नोकरी मिळाल्यानंतर ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर ही तरुणी चक्क नाचायला लागते. तिची मजेशीर प्रतिक्रिया लोकांना खूप आवडत आहे. हा व्हिडीओ ऑफिसच्या बाहेर लावलेल्या एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झासा आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळाली आहे. या तरुणीची प्रतिक्रिया पाहून तुमच्या चेहऱ्यावर पण स्मित हास्य उभं राहिल.

- Advertisement -

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर @dakara_spence द्वारा शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की – ‘मी या तरुणीची नोकरीसाठी निवड केली. पाहा बाहेर येऊन तिची प्रतिक्रिया कशी होती. व्हिडीओमध्ये मुलगी पार्किंगमध्ये उभी राहून डान्स करीत आहे.

काय आहे व्हिडीओत?

ही तरुणी कार्यालयातून बाहेर येते आणि पार्किंगच्या इथे उभी राहते. विशेष म्हणजे ती आजूबाजूला पाहते आणि नाचायला लागते. हा काही सेकंदाचा डान्स असला तरी तिने ज्याप्रकारे आनंद व्यक्त केला आहे ती पद्धत लोकांना खूप भावली आहे. हा व्हिडीओ ३० सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला असून आतापर्यंत याला ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोबत ५ लाख कमेंट्स आणि हजारो शेअर्स मिळाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – हॉटेल उघडल्यानंतर आता राज्यात सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु होणार; सरकार सकारात्मक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -