घरक्रीडाGautam Gambhir : गौतम गंभीरला जिवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Gautam Gambhir : गौतम गंभीरला जिवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Subscribe

भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरने या प्रकरणी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही धमकी ISIS कडून दिली गेल्याचा आरोपही गंभीरने केला आहे. दिल्ली पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सदर प्रकरणात अधिक तपास करत आहेत. या धमकीनंतर गौतम गंभीरच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणात गौतम गंभीरने तक्रार दाखल केली होती. (Gautam Gambhir Death threat from ISIS kashmir delhi police investigating)

मध्य दिल्लीच्या उपायुक्त श्वेता चौहान यांनी या प्रकरणाबाबतची माहिती जाहीर केली आहे. याआधीही २०१९ मध्ये एका आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून गौतम गंभीरला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. आयएसआयएस कश्मीर नावाच्या ईमेल आयडीवरून धमकीला ईमेल गौतम गंभीरला आला आहे. त्यानंतर गंभीरचे खाजगी सचिव गौरव अरोरा यांच्याकडून सेंट्रल दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी हा धमकीचा ईमेल मिळाला. तुझ्या आणि तुझ्या परिवाला जीवानिशी मारून टाकू असे धमकीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर गौतम गंभीर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

गौतम गंभीरने धमकी प्रकरणात आरोप केला आहे की, ISIS काश्मिरच्या वतीने फोन आणि ईमेलच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळेच गौतम गंभीरने स्वतःहून पुढे येत ही तक्रार दाखल केली आहे. गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच क्रिकेट सोडून राजकारणात प्रवेश केला होता. सध्या दिल्लीच्या पूर्व भागातून ते लोकसभेत खासदार आहेत.

या प्रकरणानंतर गौतम गंभीरच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. दिल्लीच्या निवासस्थानाबाहेर आता दिल्ली पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गौतम गंभीर नेहमीच आपल्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत असतो. राजकारण असो वा क्रिकेट त्याचा आक्रमकपणा हा नेहमीच दिसून आला आहे. पण त्याला जिवे मारण्याची धमकी देण्याचे काय कारण समोर आले आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

गौतम गंभीर आपल्या क्रिकेट करिअरमध्ये दोन वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा सदस्य राहिला आहे. त्यामध्ये २००७ चा टी २० वर्ल्ड कप आणि २०११ च्या वर्ल्ड कपचा समावेश आहे. दोन्ही वर्ल्ड कपमध्ये गौतमने मॅच विनिंग इनिंग खेळली होती.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -