घरक्रीडाIND vs AFG: दुसऱ्या T-20 सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल; विराटचं पुनरागमन,...

IND vs AFG: दुसऱ्या T-20 सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल; विराटचं पुनरागमन, ‘असा’ असेल प्लेइंग इलेव्हन

Subscribe

टीम इंडिया काही बदलांसह दुसऱ्या टी-20 मध्ये अफगणिस्तानविरुद्ध उतरणार आहे

India Playing 11 2nd T20 Vs Afghjanistan: टीम इंडियाने नवीन वर्षातील पहिल्या T-20 सामन्यात नेत्रदीपक विजय नोंदवला आहे. भारतीय क्रिकेट संघाने यावर्षी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. प्रथम, टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि आता अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयाने टी-20 मालिकेची सुरुवात केली. मात्र, पहिली टी-20 जिंकूनही टीम इंडिया काही बदलांसह दुसऱ्या टी-20मध्ये प्रवेश करेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल ते जाणून घ्या. (IND vs AFG Major changes in Team India for second T 20 match Virat Kohli comeback know the playing eleven)

विराट कोहलीचे पुनरागमन

माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचे दुसऱ्या टी-20मध्ये पुनरागमन निश्चित आहे. तिलक वर्माच्या जागी तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. याशिवाय टीम इंडिया इंदूरमध्ये तीन फिरकीपटूंऐवजी दोन स्पिनर्ससह मैदानात उतरू शकते. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज आवेश खानलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T-20 मध्ये भारतीय संघात तीन फिरकीपटू होते. रवी बिश्नोई, अक्षर पटेल यांच्यासह वॉशिंग्टन सुंदरचाही अंतिम अकरामध्ये समावेश होता. मात्र, सुंदरने आपल्या तीन षटकांत 27 धावा दिल्या होत्या. आता इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20मध्ये सुंदरच्या जागी आवेश खानला संधी मिळण्याची शक्यता आहे.

शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांची जागा निश्चित

शिवम दुबेने पहिल्या टी-20 सामन्यात चमकदार कामगिरी करत या मालिकेतील आपले स्थान पक्के केले आहे. जर तो याच फॉर्ममध्ये राहिला तर तो 2024 च्या टी-20 विश्वचषक संघाचाही भाग होऊ शकतो. संजू सॅमसनच्या जागी संघात निवड झालेल्या जितेश शर्मानेही अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत तो सर्व सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचाही भाग असेल. शिवम दुबेने गोलंदाजीत एक बळी घेतला आणि फलंदाजीत 60 धावांची नाबाद खेळी खेळली. तर जितेशने 20 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

- Advertisement -

दुसऱ्या T20 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर/आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -