घरक्रीडाIND vs AUS: सामन्यात रोहित शर्माला विकेटकीपर दिनेश कार्तिकवर राग अनावर; सोशल...

IND vs AUS: सामन्यात रोहित शर्माला विकेटकीपर दिनेश कार्तिकवर राग अनावर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 4 गडी राखून भारताचा पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 4 गडी राखून भारताचा पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. मात्र, या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा अनेकदा संताप व्यक्त करत होता. अशातच रोहित शर्मा भारतीय संघाचा विकेटकीपर दिनेश कार्तिक याच्यावरही भडकल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (ind vs aus 1st t20 Rohit Sharma angry on Dinesh Karthik photo viral on social media)

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा झेल घेण्यासाठी दिनेश कार्तिकने चेंडू खूप खाली येण्याची वाट पाहिली. त्यानंतर झेल घेतल्यावर तिसऱ्या अम्पायरलाही तो झेल पात्र आहे का, याची पडताळणी करावी लागली. त्यामुळे रोहित शर्मा नाराज झाला आणि त्याने कार्तिकला ओरडले. यावेळी रोहित शर्मा याने दिनेश कार्तिक याची अनुवटी पकडली होती. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

कॅमेरून ग्रीन व अॅरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला आक्रमक सुरुवात करून दिली. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांच्यावर या दोघांनी हल्लाबोल केला, पण रोहितने लगेच अक्षर पटेलला गोलंदाजीला आणले. त्याने विश्वास सार्थ ठरवताना फिंचला 22 (13) धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला 39 धावांवर पहिला धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ व ग्रीन यांनी ऑसींची धावांचा वेग 10 च्या सरासरीने कायम ठेवताना पॉवर प्लेमध्ये 1 बाद 60 धावा केल्या. स्मिथला LBW करण्याची आयती संधी भारताने गमावली.

भारताच्या 208 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ केला. कर्णधार अॅरोन फिंच माघारी परतल्यनंतर कॅमेरून ग्रीन व स्टीव्ह स्मिथ यांनी 10 च्या सरासरीने धावा करताना 10 षटकांत 1 बाद 109 धावा उभ्या केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – महिला आशिया चषक 2022 : भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार पहिला सामना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -