Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा IND vs AUS 2nd ODI LIVE : रोमांचक सामन्यात भारताचा विजय

IND vs AUS 2nd ODI LIVE : रोमांचक सामन्यात भारताचा विजय

भारत आणि आॉस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारताचा ९ धावांनी विजय झाला आहे.

Related Story

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांचक ठरला. या सामन्यात भारताचा ८ धावांनी विजय झाला. या सामन्यात कर्णधार विराट कोहली याने सामना सावरण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. विराट कोहलीचे आज वन डे सामन्यात ४० वं शतक पुर्ण झालं आहे. या सामन्यात बुमरा, विजय शंकरला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या आहेत.

भारत आणि आॉस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना झाला. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. आज ऑस्ट्रे्लियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताकडून कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल करण्यात आले होते. एॅश्टन टर्नर आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांना या सामन्यात वगळण्यात आले आहे. तर, त्याजागेवर शॉन मार्श आणि फिरकीपटू नॅथन लायन यांना स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -