घरक्रीडाIND vs NZ 2nd Test : भारताचे न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य

IND vs NZ 2nd Test : भारताचे न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य

Subscribe

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी ५४० धावांचे आव्हान दिले आहे

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी ५४० धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने ७ बाद २७६ वर दुसरा डाव घोषित केला. भारताकडून दुसऱ्या डावात मयंक अग्रवालने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी ४७-४७ धावांची खेळी केली. अक्षर पटेलने २६ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने ४ तर रचिन रवींद्रने ३ बळी घेतले. भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या डावात भारताला मयंक अग्रवालच्या रूपात पहिला झटका बसला. अग्रवालने ६२ धावांची अर्धशतकीय खेळी करून दुसऱ्या डावात देखील संघाला चांगली सुरूवात करून दिली.

दरम्यान, एजाज पटेलने सामन्याच्या दुसऱ्या डावातील पहिला आणि सामन्यातील १२ वा बळी पटकावला. त्याने अग्रवाल पाठोपाठ पुजाराला देखील माघारी पाठवले. पुजारा अर्धशतकापासून दूर राहिला तो ४७ धावांवर बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर भारताचा डाव कर्णधार कोहली आणि गिलच्या जोडीने सावरला. दोघांनी तिसऱ्या बळीसाठी २० हून जास्त धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बदल्यात भारताने ४०० धावांची आघाडी घेतली.

- Advertisement -

दुसऱ्या डावात भारताकडून मयंक आग्रवाल (६२), शुभमन गिल (४७), चेतेश्वर पुजारा (४७), विराट कोहली (३६), श्रेयस अय्यर (१४), ऋध्दिमान साहा (१३), आणि अक्षर पटेल नाबाद (४१) अशा धावा केल्या.

न्यूझीलंडकडून दुसऱ्य़ा डावात देखील एजाज पटेलने सर्वाधिक बळी घेतले. एजाजने २६ षटकांत १०६ धावा देऊन ४ बळी घेतले. तर रचिन रवींद्रने १३ षटकांत ५६ धावा देऊन ३ बळी घेतले. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याच न्यूझीलंडच्या गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही.

- Advertisement -

हे ही वाचा: http://Neeraj Chopra : …जेव्हा नीरज चोप्रा लहान मुलांना भालाफेकीचे ट्रेनिंग देतो; पंतप्रधान मोंदीनी दिली प्रतिक्रिया


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -