घरक्रीडाभारत जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, कसे ते पाहा

भारत जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, कसे ते पाहा

Subscribe

नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने जिंकल्यामुळे भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचला आहे.

भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यात श्रीलंका दोनपैकी एका कसोटीत पराभव किंवा अनिर्णित राहण्याची गरज होती. परंतु न्यूझीलंड संघाने पहिल्याच कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यामुळे भारताला मोठा फायदा झाला आहे. कारण आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या निकाला काहीही लागला तरी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या समीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण भारत सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

- Advertisement -

शेवटच्या वेळी 2021 मध्ये भारत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला होता. यावेळी न्यूझीलंडने भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यास मदत केली होती. यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीत खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये सध्या चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. ज्यामध्ये भारत २-१ ने पुढे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ७ ते ११ जून दरम्यान खेळवला जाणार आहे.

दरम्यान न्यूझीलंड आणि श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने पहिल्या डावात 355 धावा केल्या. त्याचवेळी न्यूझीलंडने पहिल्या डावात 373 धावा केल्या. अशा प्रकारे न्यूझीलंडने पहिल्या डावात 18 धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 302 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला दुसऱ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळाले होते. केन विल्यमसनच्या शतकी खेळीमुळे सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला.

- Advertisement -

या सामन्यात केन विल्यमसनने दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना मॅरेथॉन इनिंग खेळली. एका बाजूने सातत्याने विकेट पडत असताना केन विल्यमसनने शेवटपर्यंत आपली विकेट राखून धावत काढल्या. विल्यमसनने या सामन्यात १९४ चेंडूंचा सामना करताना त्याने ११ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने नाबाद 121 धावा केल्या. याशिवाय न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेलने 81 धावांचे योगदान दिले, तर टॉम लॅथन 25 आणि हेन्री निकोल्सने 20 धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -