घरमनोरंजनदिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभासने केलं रावण दहन; व्हिडीओ व्हायरल

दिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभासने केलं रावण दहन; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

प्रभास दसऱ्याच्या दिवशी दिल्ली येथे पोहोचला आणि लाल किल्ल्यामध्ये होणाऱ्या रामलीलेतील रावणाचे त्याने दहन केले. प्रभासचे हे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

टॉलिवूड अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरूष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर सोशल मीडियावरून चित्रपटाला ट्रोल करण्यात आलं. याचं दरम्यान, प्रभास दसऱ्याच्या दिवशी दिल्ली येथे पोहोचला आणि लाल किल्ल्यामध्ये होणाऱ्या रामलीलेतील रावणाचे त्याने दहन केले. प्रभासचे हे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. शिवाय प्रभासने देखील त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

प्रभासने शेअर केला व्हिडीओ आणि फोटो

- Advertisement -

दिल्लीमधील लाल किल्ल्यामध्ये लव कुश रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रामलीलेमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने रावण दहन करण्यात आलं. या वेळी प्रभास देखील तिथे पोहोचला होता. स्टेजवर उभं राहून त्याने रावणाचे दहन केले. या रामलीलेमध्ये प्रभासला पाहण्यासाठी अनेकांना गर्दी केली. दिल्लीतील हा व्हिडीओ आणि फोटो प्रभासने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले. या वेळी प्रभाससोबत चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राउत आणि निर्माते भूषण कुमार देखील उपस्थित होते.

- Advertisement -

‘आदिपुरूष’ या 5 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, सध्या या चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली जात आहे.


हेही वाचा :

आमीर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -