घरक्रीडाइंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना देण्यात येणार कोविशील्ड लस, पण का? 

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना देण्यात येणार कोविशील्ड लस, पण का? 

Subscribe

भारताच्या खेळाडूंना इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाला. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि ग्राऊंड स्टाफच्या सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे यंदाचा आयपीएल मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला असून खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. भारतीय क्रिकेटपटू आता काही दिवस आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकणार आहे. परंतु, त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडमध्येच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून यात भारतापुढे न्यूझीलंडचे आव्हान असेल. परंतु, भारताच्या खेळाडूंना इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी कोविशील्ड या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोविशील्ड लसच का?

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये सध्या प्रामुख्याने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर केला जात आहे. परंतु, इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या क्रिकेटपटूंना कोविशील्ड लस घेण्यास सांगण्यात आले आहे, कारण ही लस इंग्लंडच्या ऑक्सफर्डच्या अ‍ॅस्ट्राजेनेकाने विकसित केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना या लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्येही घेता येऊ शकेल.

- Advertisement -

भारताचा इंग्लंड दौरा कधी? 

भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना साऊथहॅम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होईल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -