घरक्रीडाTeam India's cricket schedule for 2022 : रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाचे २०२२...

Team India’s cricket schedule for 2022 : रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाचे २०२२ चे वेळापत्रक

Subscribe

भारताचे २०२१ वर्षाचे वेळापत्रक खूपच व्यस्त होते. पण अशा भरगच्च शेड्यूल्डमध्येही भारताने चमकदार कामगिरी करत अनेक विक्रम या वर्षात आपल्या नावे केले. त्यामध्ये विराट कोहलीच्या खांद्यावरील कर्णधार पदाची जबाबदारी ही रोहित शर्माकडे येण्यासारख्या अनेक घडामोडींचा समावेश होता. यंदाच्या म्हणजे २०२२ वर्षाच्या सामन्यांमध्येही भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त राहणार आहे. संपूर्ण वर्षभरातील वेळापत्रकात सगळ्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत त्या म्हणजे पुरूषांच्या T20 वर्ल्ड कपसाठी. त्यासोबतच अनेक महत्वाचे दौरे आणि घरगुती मालिकांचाही यंदाच्या वर्षातील वेळापत्रकात समावेश आहे.

यंदाच्या २०२२ वर्षातील भारतीय संघातील पहिली असाईनमेंट म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग(IPL)ची. यंदा १० संघाचा समावेश आयपीएलमध्ये असणार आहे. यंदाच्या वर्षातील आयपीएल हंगामाचे मेगा ऑक्शन म्हणजे लिलाव प्रक्रिया ही फेब्रुवारीमध्ये पार पडेल.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिका दौरा

भारतीय संघ हा सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्यामध्ये भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ हा आपला पहिला दक्षिण आफ्रिकेतील मालिका विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. कसोटी पाठोपाठच भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. रोहित शर्मा फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करू न शकल्यानेच या सामन्यात के एल राहुलकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भारत वि दक्षिण आफ्रिका

कसोटी सामने

- Advertisement -

दुसरी कसोटी – ३ जानेवारी ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी – ११ जानेवारी ते १५ जानेवारी – केपटाऊन

एकदिवसीय सामने

1st ODI – 19 जानेवारी, पार्ल
2nd ODI – 21 जानेवारी, पार्ल
3rd ODI – 23 जानेवारी, केप टाऊन

वेस्ट इंडिज, श्रीलंकेचा भारत दौरा

भारताने दक्षिण आफ्रिका दौरा पूर्ण केल्यानंतर घरगुती मालिकांमध्ये ६ फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. त्यामध्ये तीन कसोटी आणि टी २० सामन्यांचा समावेश असेल.

त्यापाठोपाठच भारताकडे श्रीलंकेविरोधात दोन कसोटी आणि तीन टी २० सामन्यांचे यजमानपद असेल.

भारत वि वेस्ट इंडिज (३ एकदिवसीय सामने, ३ टी२०)

1st ODI – February 6, अहमदाबाद
2nd ODI – February 9, जयपूर
3rd ODI – February 12, कोलकाता
1st T20I – February 15, कटक
2nd T20I – February 18, वायझॅग
3rd T20I: February 20, त्रिवेंद्रम

भारत वि श्रीलंका (२ कसोटी, ३ टी२०)

1st Test – February 25-March 1, बंगळुरू
2nd Test – March 5-9, मोहाली
1st T20I: March 13, मोहाली
2nd T20I: March 15, धर्मशाला
3rd T20I: March 18, लखनौ

इंडियन प्रीमिअर लीग
यंदाच्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आयपीएलचा हंगाम पार पडणार आहे. याआधी २०२० मध्ये तसेच २०२१ मध्ये आयपीएलचा हंगाम हा कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. तर २०२१ च्या हंगामात दोन टप्प्यात सामने पार पडले.

दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा

भारतात जून महिन्यात खूपच कमी वेळा दौरा आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे भारतातील उकाडा. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ याच कालावधीत भारत दौऱ्यासाठी येत आहे. त्यामध्ये पाच टी २० सामने असणार आहेत.

India vs South Africa (5 T20Is)

1st T20I – June 9, चेन्नई
2nd T20I – June 12, बंगळुरू
3rd T20I: June 14, नागपूर
4th T20I: June 17, राजकोट
5th T20I: June 19, दिल्ली

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा

गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये कोरोनाच्या परिस्थितीमुळे भारतीय संघाने इंग्लंड दौरा अर्धवट सोडला होता. याच दौऱ्यातील पाचवा कसोटी सामना भारत जुलैमध्ये खेळणार आहे. त्यामध्ये टी२० आणि एकदिवसीय सामन्यांचाही समावेश आहे.

इंग्लंड वि भारत (५ वा कसोटी सामना, ३ एकदिवसीय सामने, ३ टी २० सामने)

5th Test – July 1-5, मॅंचेस्टर
1st T20I – July 7, साऊथॅम्पटन
2nd T20I – July 9, बिरमिंघम
3rd T20I – July 10, नॉटिंघम
1st ODI – July 12, लंडन
2nd ODI – July 14, लंडन
3rd ODI – July 17, मॅंचेस्टर

वेस्ट इंडिज दौरा

भारताने २०१९ पासून वेस्ट इंडिज संघासोबत सामना खेळलेला नाही. याआधी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आमने सामने आले होते. भारतीय संघ तीन टी २० आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्याच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. पण जुलै किंवा ऑगस्टमध्ये हा दौरा अपेक्षित आहे.

आशिया कप

यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया कप आयोजित करण्यात आला आहे. याआधीच म्हणजे २०२० मध्ये हा कप आयोजित करण्यात येणार होता. पण काही कारणास्तव तो २०२१ मध्ये ढकलण्यात आला होता. पण कोरोनामुळे हा कपही वारंवार पुढे ढकलण्यात आला. यंदाचा आशिया कप हा श्रीलंकेत होणार आहे. त्यामध्ये भारतीय संघ हा पाकिस्तान संघासोबत भिडताना दिसेल. या आशिया कपच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

टी २० वर्ल्ड कप

यंदाच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ टी २० मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ विजेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत असेल. याआधी २०२१ मध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सुपर १२ स्टेजमध्येच बाहेर पडला होता. यंदा २०२२ चा टी २० वर्ल्ड कप १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

बांगलादेश दौरा

भारतीय संघाचा बांगलादेश दौरा हा अद्याप निश्चित झालेला नाही. पण या दौऱ्यात दोन कसोटी सामने तर तीन एकदिवसीय सामने भारतीय संघ खेळणार आहे.


Harbhajan Singh: माझ्या कारकिर्दीत अनेक व्हिलन, धोनीनंतर BCCI वर भज्जीचा निशाणा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -