घरक्रीडाHarbhajan Singh: माझ्या कारकिर्दीत अनेक व्हिलन, धोनीनंतर BCCI वर भज्जीचा निशाणा

Harbhajan Singh: माझ्या कारकिर्दीत अनेक व्हिलन, धोनीनंतर BCCI वर भज्जीचा निशाणा

Subscribe

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केलं आहे. परंतु त्याचवेळी हरभजन सिंगने काही खुलासे देखील केले आहेत. माझ्या कारकिर्दीत अनेक व्हिलन ठरले, असा आरोप करत त्याने धोनीनंतर बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. महेंद्रसिंग धोनीवर आरोप करत हरभजन म्हणाला की, मला संघातून बाहेर कशासाठी काढण्यात आलं होतं?, याचा खुलासा एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना हरभजनने केला आहे.

कारकिर्दीबाबत भज्जीचा खुलासा…

हरभजन सिंगने कारकिर्दीबाबत सांगितलं की, लक नेहमीच माझ्यासोबत होतं. काही जण माझ्यासोबत नव्हते. त्यामुळे मी असही म्हणू शकतो की, ते पूर्णपणे माझ्याविरोधात होते. त्याचं कारण होतं माझा खेळ. मी चांगली गोलंदाजी करत होता आणि प्रदर्शनही उत्कृष्ट होतं. तेव्हा मी ३१ वर्षांचा होतो. त्यावेळी मी ४०० गडी बाद केले होते. परंतु माझ्या डोक्यात अजून चार ते पाच वर्ष खेळण्याचा विचार होता. तसं झालं असतं तर मी अजून शंभर ते दीडशे गडी बाद केले असते.

- Advertisement -

धोनीचा बीसीसीआयला पूर्णपणे पाठिंबा

कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनी जेव्हा भारताचा कर्णधार होता. त्यावेळेस सगळ्या गोष्टी धोनीच्या डोक्यावरुनही जात असाव्यात,असं मला वाटतं. कारण यामध्ये काही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. मी पुढे खेळू नये, असं त्यांना वाटत होतं आणि कर्णधार धोनीने सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला. इतर क्रिकेटर्सच्या तुलनेत धोनीला बीसीसीआयचा चांगला पाठिंबा मिळाला. असाच पाठिंबा जर इतर खेळाडूंना मिळाला असता तर त्यांनीही उत्कृष्ट आणि शानदार खेळी केली असती. प्रत्येक खेळाडूला वाटतं की, टीम इंडियाची जर्सी घालूनच रिटायर व्हावं. पण असं सगळ्यांसोबत होत नाही. राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यांसारख्या खेळाडूंना एक उदाहरण म्हणूण तुम्ही बघू शकता, असं भज्जी म्हणाला.

माझ्या बायोपिकमध्ये एक नाही तर अनेक व्हिलन

माझ्या कारकीर्दीबाबत एखादी बायोपिक फिल्म किंवा वेब सिरीज बनावी, असं मला वाटतं. कारण लोकांना माझीही बाजू कळावी. मी करीअरमध्ये काय केलं आणि इतरांनी माझ्यासोबत काय केलं हे लोक बघू शकतील. माझ्या बायोपिकमध्ये एक नाही तर अनेक व्हिलन असतील, असं भज्जी म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai Bank Election : सहकार क्षेत्रात राजकारण नको म्हणून एकत्र लढतोय – प्रविण दरेकर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -