घरIPL 2020IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सचा रसगुल्ला हैदराबादी बिर्याणीवर पडला भारी!

IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सचा रसगुल्ला हैदराबादी बिर्याणीवर पडला भारी!

Subscribe

IPL अर्थात Indian Premier League च्या तेराव्या सीजनमध्ये आज भिडत होती ती SRH vs KKR या दोन संघांमध्ये! या दोन्ही टीम्सचा यंदाच्या सीजनमधला हा दुसरा सामना होता. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामना गमावला होता. त्यामुळे दोघांचाही प्रयत्न सीजनमधला पहिला विजय मिळवून पॉइंट टेबलवर गुण चढवण्याचा होता. अखेर या चढाओढीमध्ये Kolkata Knight Riders ने बाजी मारली. Sunrisers Hyderabad वर KKR ने तब्बल ७ विकेट्स राखून विजय मिळवला. टॉस जिंकून सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हैदराबादला २० ओव्हर्समध्ये ४ बाद १४२ रन्स करता आले. उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने ७ विकेट्स आणि २ ओव्हर्स शिल्लक ठेऊन हा सामना खिशात घातला आणि सीजनचा पहिला विजय आपल्या नावावर केला.

शुभमन गिलची अविस्मरणीय खेळी!

कोलकाताच्या इनिंगमध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली ती सलामीवीर शुभमन गिल यानं केलेली ६२ बॉल्समध्ये नाबाद ७० रन्सची खेळी! १४२ रन्सचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये सुनील नरेन ० रन्सवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या नितीश राणाने शुभमन गिलसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाच्या ४३ धावा स्कोअरबोर्डवर असताना नितीश राणा देखील २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार दिनेश कार्तिक देखील ० धावांवर माघारी परतला. त्यानंतर मात्र इऑन मॉर्गन (नाबाद ४२) आणि शुभमन गिल यांनी कोलकाताच्या डावाला आकार दिला आणि सनरायजर्सला नमवत कोलकात्याचा विजय साकार केला.


IPL 2020 : मनीष पांडेचे अर्धशतक; केकेआरविरुद्ध हैदराबाद ४ बाद १४२
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -